Walmik Karad Property सध्या महाराष्ट्र आणि देशभरात एक नाव सतत चर्चेत आहे ते म्हणजे “आका”.
कोणी त्याला देव म्हणतं, तर कोणी त्याला अण्णा म्हणतं, तर कोणा साठी तो गॉड फादर आहे. त्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरत आहेत. आणि उपोषण करायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीयेत. कोणी म्हणतंय की अण्णा वर अन्याय झालाय, अन् कोणाला तर वाटतंय की बॉस ला राजकारण करून जाणून बुजून अडकवल जातंय. नेमका काय विषय तर मित्रांनो वाचा सविस्तर बातमी. Walmik Karad Property
नमस्कार मित्रानो, आज आपण वाल्मीक कराड बद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील वाल्मिक कराड हे नाव सध्या राज्यभरात वेगवेगळ्या चर्चांना जन्म देत आहे. एक साधारण घरकाम करणारा मुलगा, जो दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरात घरगडी काम करत होता, आज त्या व्यक्तीच्या नावाशी संबंधित गंभीर आरोप आणि वादविवाद ऐकायला मिळत आहेत. Walmik Karad Property
कराडच्या एवढ्या मोठ्या संपत्तीच्या मागे काही अवैध व्यवसाय असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून होतो आहे. त्याचप्रमाणे, अनेक गुन्हेगारी प्रकरणांतून त्याचे नाव समोर येत आहे.
वाल्मिक कराडने जमवली अवैध व्यवसायातून संपत्ती Walmik Karad Property
वाल्मिक कराडच्या संपत्तीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुरेश धस यांनी म्हटलं की, कराडची एकूण संपत्ती अंदाजे 1500 कोटी रुपयांची आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांशी शेत जमिनी वाल्मीक कराडने स्वतःच्या नावावर लादल्या आहेत. ज्यात गायरान जमीन आणि सरकारी जमिनींवर झालेल्या व्यवहारांचा समावेश आहे. कराडच्या नावावर एकाच गावात अनेक एकर जमीन आहे आणि त्याच्या नावावर होणारे काही व्यवहार खूपच मोठे आहेत. त्याच्यावर आरोप केले जात आहेत की त्याने आपली संपत्ती वाळू उपसा, केमिकल ताडी, हातभट्टी दारू विक्री, वाळू उपसा आणि इतर अनेक गुन्हेगारी व्यवसायातून निर्माण केली. Walmik Karad Property In Pune

सुरेश धस यांनी जणू एक संपूर्ण पाढाच वाचला आहे, ज्यात कराडच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात विविध तपशील दिले गेले आहेत. त्यांनी बीडमधील टेंबुर्णी गावात नऊ अब्ज कोटींचा व्यवहार झाला असल्याचे सांगितले आहे. त्याशिवाय, शिरसाळा गावात 600 वीभट्ट्यांपैकी 300 गायरान जागेवर वाल्मीक कराडने ताबा घेतला आहे. याशिवाय, बीड जिल्ह्यातील वाळू आणि राख वाहतुकीवरही त्याचे नियंत्रण असल्याचे सांगितले जाते. Walmik Karad Property
कराडच्या मागे मोठी राजकीय ताकद
कराडचे नाव बीडमधील राजकीय व गुन्हेगारी वर्तुळात सध्या अनेक प्रश्नांची साखळी तयार करत आहे. त्याचे वाढते आर्थिक साम्राज्य अनेक राजकीय नेत्यांच्या नजरेत आले आहे. विशेषतः, मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने हा वाद जास्त तापलेला दिसतो. सुरेश धस यांचे आरोप आहेत की, मुंडे आणि कराड यांनी एकत्रितपणे व्यवसाय केले आहेत आणि यातून अनेक गैरप्रकार केले आहेत. Walmik Karad Political Power
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. तसेच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही गंभीर आरोप केले आहेत की, मुंडे आणि कराड यांची एकत्रित संपत्ती आणि जमीन आहे. यामध्ये काही खास कागदपत्रे दाखवून त्यांनी कराडच्या संपत्तीवर प्रकाश टाकला आहे. Anjali Damania on Walmik Karad
त्यांच्या म्हणण्यानुसार, कराडच्या नावावर 88 एकर जमीन आहे आणि त्याच्यावर अनेक कंपन्या नियंत्रित आहेत, ज्यात शुगर मिल्स आणि इतर उद्योग समाविष्ट आहेत.
तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या व्यावसायिक हितसंबंधावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासह व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये कराड, मुंडे आणि मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांचा समावेश आहे. या कंपनीच्या कागदपत्रांतून हे स्पष्ट होत आहे की, या दोघांनी एकत्रितपणे जमीन आणि व्यवसाय केला आहे. यामुळे, कराडने सार्वजनिक ठिकाणी आणि प्रशासनावर दबाव आणून आपल्या व्यवसायांना चालना दिल्याचा आरोप केला जात आहे. Walmik Karad crimes
राखेतून उभा केला प्रचंड पैसा Walmik Karad crimes
त्याचप्रमाणे, कराडने बीड जिल्ह्यातील औष्णिक वीज प्रकल्पातही अनैतिक मार्गाने प्रचंड पैसा कमावला आहे, असं सांगितलं जात आहे. राखेचे विक्री आणि कोळसा वाहतुकीच्या कॉन्ट्रॅक्ट्सवर त्याच्याच लोकांचे वर्चस्व आहे. या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेवर त्याचे नियंत्रण असल्याचा आरोपही करण्यात आले आहे. दरवर्षी हजारो कोटींची राख या प्रकल्पातून बाहेर पडते, आणि ती राख इमारतींच्या बांधकामासाठी, विटा बनवण्यासाठी, आणि सिमेंट उद्योगात वापरली जाते. तसेच या उद्योगातील कॉन्ट्रॅक्टर हे वाल्मीक कराडच्या मर्जीतील लोक आहेत त्यामुळे इतर लोकांना हे लोक कॉन्ट्रॅक्ट घेऊन देत नाहीत परिणामी इतर लोकांना दमदाटी करून हे लोक हाकलून देतात असाही आरोप त्यांनी केला आहे. Walmik Karad Property
कराडने सरकारी जमिनीवर केला कब्जा
वाल्मिक कराडने किती संपत्ती जमवली आहे यावरून अनेक दावे केले जात आहेत. त्याच्यावर आरोप केले जात आहेत की त्याने अनेक गायरान जमिनी घेतल्या, सरकारच्या जमिनींवर कब्जा केला, आणि इतरांच्या जमिनींवर मुरूम टाकून त्यांची विक्री केली. परंतु, याबाबत स्पष्ट माहिती मिळणे कठीण आहे कारण कराडची संपत्ती आणि त्याचे व्यवसाय आतापर्यंत खूप गुप्त ठेवले गेले आहेत. असेही बोलले जात आहे कि या जमिनी वाल्मीक कराडने आपले नातेवाईक तसेच आपला ड्रायव्हर यांच्या नावे केली आहे. बीड जिल्ह्यातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, कराडच्या नावावर 100 एकर, 150 एकर आणि इतर ठिकाणी जमिनी आहेत.
कराड गॅंगची पुण्यातही आहे मोठी संपत्ती
पुण्यातील हाय प्रोफाईल परिसर म्हणून मगरपट्ट्याला ओळखले जाते. पण या मगरपट्टा परिसरात त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर एक फ्लोर बुक असल्याचा आरोप केला जातो. तसेच एका कॉलेजच्या समोर असलेल्या एका आलिशान भल्या मोठ्या इमारतीमध्ये सुद्धा कराडने गुंतवणूक केली असल्याचे समोर आले आहे. Walmik Karad Property in Pune
वाल्मीक कराड वर खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल
वाल्मिक कराडविरुद्ध सध्या अनेक गुन्हे दाखल आहेत. अवादा कंपनीकडून खंडणी मागणं, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग, आणि इतर आरोप त्याच्या नावाशी जोडले गेले आहेत. खंडणीच्या प्रकरणात, कराड 22 दिवस फरार होता आणि त्याच्या संपत्तीवर कारवाई करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने त्याची बँक खाती गोठवली आणि त्याच्या संपत्तीवर जप्तीचे आदेश दिले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कराडच्या सरेंडरची प्रक्रिया विवादास्पद ठरली आहे. काही लोक त्याच्या सरेंडरला स्क्रिप्टेड म्हणतात, तर काहींच्या मते तो फक्त आर्थिक कोंडीमुळे पोलीसांसमोर आला आहे असे म्हटले जात आहे.
कराडला मिळत आहे गुप्तपणे राजकीय सपोर्ट
बीड जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी वाल्मीक कराड ची सर्व गुन्हे पाठीशी घालत आहे व आपल्या राजकीय ताकतीचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकून कराडच्या मागे उभा राहत आहे, असा आरोप सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपचे नेते यावर वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे व अन्य नेत्यांवर आरोप झाल्यामुळे, कराड आणि त्याच्या आर्थिक साम्राज्याच्या संदर्भात अनेक महत्वाचे मुद्दे उभे राहिले आहेत. Walmik Karad Property
एकंदरीत, कराड आणि त्याच्या संपत्तीवर असलेले आरोप, त्याचे राजकीय आणि आर्थिक नातेसंबंध, तसेच त्याची गुन्हेगारी कारकीर्द हे सर्व मुद्दे महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहेत. यावर सुस्पष्ट आणि विस्तृत तपास होणे गरजेचे आहे, जेणेकरून कराडच्या राजकीय व आर्थिक साम्राज्याची खरी कहानी लोकांच्या नजरेसमोर येईल.
वाल्मीक कराड वर ईडीचा डोळा ED on Walmik Karad
वाल्मीक कराडने अनैतिक मार्गाने गुन्हेगारी कारवाई करून पंधराशे कोटींची संपत्ती गोळा केली आहे. याबाबत ईडी कडे तक्रारी दाखल झाले आहेत त्या अनुषंगाने वाल्मीक कराडची संपत्ती ईडी जप्त करून त्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व ईडीने वाल्मीक कराडला नोटीसही पाठवली आहे असेही बोलले जात आहे.
बीड पोलीस प्रशासनात वाल्मीक कराडचा दबदबा
मध्यंतरी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात वायरल झाली होती की, वाल्मीक कराड बल्लाळ नामक पोलीस अधिकारी यांना सूचना देत आहे की आठवले याच्यावर खोटे गुन्हा दाखल करा. आणि त्याला या खोट्या प्रकारात अडकवा. पण पोलीस अधिकारी बल्लाळ यांनी स्पष्ट केले की ही ऑडिओ फेक आहे व या घटनेचा आपल्याशी काहीही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. Walmik Karad Police Relation
तसेच काल आणखीन एक नवी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्या ऑडिओ क्लिप नुसार नाशिक मधील वाल्मीक कराडचा एक कार्यकर्ता वाल्मीक कराडला फोन लावून सांगत आहे की, पोलीस त्याला वारंवार फोन लावून विचारपूस करत आहे. तेव्हा वाल्मीक कराडनी थेट सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्या व्यक्तीला फोन न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी या सर्व कथित ऑडिओ प्रकरणी बीड जिल्हा पोलीस प्रमुख यांनी सूचना केल्या आहेत की या प्रकरणातील जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
तर मित्रांनो या वाल्मीक कराड आणि त्याच्या संपत्ती बद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
हे हि वाचा :-
छ. संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटामुळे निर्माण झाला वाद
स्वबळाचा नारा उद्धव ठाकरेंसाठी फायद्याचा कि तोट्याचा?