Chhava Movie Dispute In Maharashtra नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट काढण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. आपल्या राजांचा दैदीप्यमान इतिहास मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी आता बरेच दिग्दर्शक, निर्माते, कलाकार मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत व आजपर्यंत लपला गेलेला आपला इतिहास सर्वांच्या नजरेसमोर आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित असलेल्या “छावा” या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची उत्कंठा महाराष्ट्रातील तमाम मराठी जणांना होतीच त्यासोबतच हिंदी भाषिक लोकांना सुद्धा या चित्रपटाची उत्कंठा लागली होती आणि हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी 2025 ला संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. आणि या चित्रपटाच्या अनुषंगाने आजपर्यंत आपल्या नव्या पिढीला माहिती नसलेला छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास आता भव्य दिव्य अशा मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आपणास योग येणार आहे. त्यामुळेच या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. Chhava Movie Dispute In Maharashtra
पाच दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला हा ट्रेलर जवळपास 35 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी युट्युब वर बघून विक्रमी असा प्रतिसाद दिला आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विकी कौशल आहे आणि महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मांधना असून या चित्रपटात अभिनेत्यांची मोठी स्टार कास्ट आहे. अक्षय खन्ना यांसह इतर अभिनेते, अभिनेत्री त्यासोबतच आपले काही मराठी अभिनेते सुद्धा या चित्रपटात आपणास पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच हा एक बिग बजेट चित्रपट आहे. Chhava Movie Dispute In Maharashtra

पण नुकत्याच लॉन्च झालेल्या ट्रेलरमुळे आता काही वाद निर्माण झाले आहेत. चित्रपटामधील काही संवाद, दृश्य यामुळे हा वाद उफाळून आला आहे, परिणामी चित्रपट प्रदर्शित न होण्यासाठी काही मंडळी आक्रमक झाली आहेत. Chhava Movie Dispute In Maharashtra
नेमका काय आहे वाद? Chhava Movie Dispute In Maharashtra
1) लेझीम वर नृत्य
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्या काही दृश्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना नाचताना दाखवले आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई या लेझीम वर नाचत असल्याचे या ट्रेलरमध्ये दाखवले आहे. पण हे दृश्य शिवप्रेमींना आवडलेले नाही. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात या दृश्याचा विरोध होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी आपल्या जीवाचे बलिदान देऊन समाजापुढे एक मोठा आदर्श ठेवला आहे. महाराष्ट्रातील व देशभरातील तमाम जनता त्यांना आपला आदर्श, आपली प्रेरणा मानते. पण या चित्रपटात त्यांना चुकीच्या पद्धतीने नाचत असल्याचे दाखवून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे समस्त शिवप्रेमींचे आणि काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा वाद मोठ्या प्रमाणात आणि सर्व स्तरातून उफाळून येत आहे. Lezim Dance in Chhava Movie
2. हिंदवी शब्द न उच्चारणे
चित्रपटाच्या ट्रेलरमधील आणखी एक वादग्रस्त गोष्ट म्हणजे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा” हा संवाद आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून प्रेरित असलेली ही घोषणा आहे. पण या चित्रपटात ही घोषणा छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली आहे. पण ही घोषणा हिंदवी शब्द वगळून ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मूळ घोषणेत बदल करून ते चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर अनेक इतिहासकार आणि नेटकऱ्यांनी तिव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हिंदवी हा शब्द जाणून बुजून वगळण्यात आला आहे अशीही टीका होत आहे. Hindavi word missing in chhava movie
3. औरंगजेबाला दिले गेले विशेष महत्त्व
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आणखी एक वादग्रस्त बाब म्हणजे औरंगजेबाला दिले गेलेले विशेष महत्त्व. अभिनेता अक्षय खन्ना हा औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. अक्षय खन्ना यांनी प्रभावीपणे काम करून औरंगजेबाची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. त्यामुळे अक्षय खन्ना यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. पण चित्रपटात चित्रपटात औरंगजेबाचा उल्लेख “शहंशाह” असा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्त नाराज झाले आहेत. तसेच या क्रूर औरंगजेबाला चित्रपटात विशेष महत्त्व देण्यात आले आहे तसेच त्याची भूमिका चांगली करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टीका मोठ्या प्रमाणात होत आहे. Chhava Movie Dispute In Maharashtra
मुळात औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी असा मुघल शासक म्हणून सर्व देशात परिचित आहे. त्याच्या क्रूरतेने अन् अत्याचाराने कळस गाठला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याला वेळोवेळी ठेचून त्याची स्वराज्यावर आक्रमणे होऊ दिले नाही आणि त्याचा मनसुबा वेळोवेळी उधळून लावला. पण त्याच औरंगजेबाला या चित्रपटामध्ये विशेष महत्त्व दिले जात असून त्याचा केलेला आदर हा इतिहासकारांना आणि शिवप्रेमींना आवडलेला नाही. त्यामुळे हा वाद आता निर्माण होत आहे. Chhava Movie Dispute In Maharashtra
मराठा क्रांती मोर्चाचा चित्रपटाला विरोध
चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा ने यावर आक्षेप नोंदवला आहे. व या चित्रपटातील चुकीचे संवाद, चुकीची दृश्ये आणि औरंगजेबाला दिला गेलेला आदर तात्काळ हटवण्यात यावा, यासाठी पुण्यात निषेध नोंदवला गेला आहे. तसेच जोपर्यंत या चित्रपटातील चुकीची दृश्ये आणि संवादे हटवणार नाही तोपर्यंत हा चित्रपट महाराष्ट्रात आणि देशात प्रदर्शित करू देणार नाही. तसेच जर हा चित्रपट प्रदर्शित झालाच तर चित्रपट बंद पाडण्यात येईल असा धमकी वजा इशाराच मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्याने या चित्रपटाच्या टीमला दिला आहे. Chhava Movie Dispute In Maharashtra
दिग्दर्शकाची सकारात्मक भूमिका
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व त्यांनी जाहीर सुद्धा केले आहे की, जी काही दृश्ये, संवाद चुकीची वाटत आहेत ती दृश्य आम्ही कमी करून हा चित्रपट प्रदर्शित करू तसेच कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याचीही खात्री घेतली जाईल असेही त्यांनी जाहीर केले आहे. Chhava Movie Dispute In Maharashtra
तसेच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या विकी कौशल यांनी ट्रेलरवरील या दृश्यांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे की, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आम्ही फक्त एक पारंपरिक नृत्य दाखवले आहे, याचा उद्देश काय आहे हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही असे त्यांचे मत आहे. Chhava Movie Dispute In Maharashtra
छत्रपती उदयनराजे आणि संभाजी राजे छत्रपती यांनी दिला इशारा
चित्रपटाच्या ट्रेलरमुळे उफाळून आलेल्या वादावर आता संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. छत्रपती उदयनराजे यांनी दिग्दर्शकाला फोन लावून चुकीची दृश्ये हटवण्यास सांगितले आहेत. तसेच संभाजी राजे छत्रपती यांनी चुकीचा इतिहास दाखवणार असाल तर याद राखा असा सज्जड दम दिला आहे. Uadayanraje Bhosale on Laxman Utekar
दिग्दर्शकाने घेतली राज ठाकरेंची भेट
चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी व आपली भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली व या चित्रपटाबद्दल असलेले चुकीचे गैरसमज सांगितले. त्यासोबतच जे काही चुकीचे दृश्य आहेत ती हटवूनच चित्रपट प्रदर्शित करणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. Laxman Utekar mate to Raj Thackarey
अखेर ते वादग्रस्त नृत्य हटवले जाणार Chhava Movie Dispute In Maharashtra
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दिग्दर्शक यांनी जाहीर केले की जर कोणाच्या भावना दुखावत असतील तर आम्ही तो लेझीम नृत्याचा दृश्य हटवणार आहोत. लेझीम हा फ्लाईक पारंपरिक खेळ आहे. म्हणूनच आम्ही ते चित्रपटांमध्ये दाखवले होते अशी भूमिका दिग्दर्शक यांनी मांडली
29 जानेवारीला स्पेशल स्क्रीनिंग चे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार छत्रपती उदयनराजे आणि संभाजी राजे छत्रपती यांच्याशी संवाद साधून स्पेशल स्क्रीनिंग करून हा चित्रपट पाहिला जाणार आहेत व ज्या काही सूचना मिळतील ते दृश्य, संवाद हटवूनच चित्रपट रिलीज करणार आहे. Chhava Movie Release date
यासाठीच येणाऱ्या 29 जानेवारीला संभाजी राजे छत्रपती यांच्यासह काही इतिहासकार यांचे साठी मुंबई येथे या स्पेशल स्क्रीनिंग चे आयोजन केले आहे. जेणेकरून चित्रपटाबद्दलचे पसरलेले काही गैरसमज दूर होतील व राजे या चित्रपटाला मान्यता देतील अशीही अपेक्षा दिग्दर्शकांनी व्यक्त केली. Chhava Movie Screening on 29 January
चित्रपट रचणार इतिहास..! Chhava Movie Box Office Collection
चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या अभूतपूर्व प्रचंड प्रतिसादावरून तज्ञ लोकांचे असे म्हणणे आहे की, हा चित्रपट महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात हाउसफुल चालेल व 1000 कोटींचा पल्ला सुरुवातीच्या काही दिवसातच गाठून हा चित्रपट कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Chhava Movie Box Office Collection
हे हि वाचा :-
एकाच कुटुंबातील तब्बल 17 जणांचा मृत्यू
तब्बल 14 जणांची हत्या करून मृतदेहाच्या मेंदूचं सूप करून पिले