स्वबळाचा नारा उद्धव ठाकरेंसाठी फायद्याचा कि तोट्याचा? | Uddhav Thackeray Maharashtra

WhatsApp Group Join Now

Uddhav Thackeray Maharashtra 2025 मध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. 11 जानेवारी 2025 रोजी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गट आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर राज्यभरात ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्धार का केला? याचे राजकीय आणि पक्षीय अर्थ काय असू शकतात? स्वबळावर निवडणुका लढल्यानंतर ठाकरे गटाला फायदा होईल का, की तोटा? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी खालील लेख आवर्जून वाचा.

ठाकरे गटाची स्वबळावर निवडणुक लढण्याची घोषणा

11 जानेवारीला खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली. या घोषणेने राज्यभरात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना ऊत आला. विशेषत: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार का, याबद्दल जनतेच्या मनात गोंधळ निर्माण झाला. Uddhav Thackeray Maharashtra

WhatsApp Group Join Now
Uddhav Thackeray Maharashtra

स्वबळावर निवडणुका लढण्याच्या ठाकरे गटाच्या निर्णयाला एकंदर एक सकारात्मक संदर्भ आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीचा मोठा पाठिंबा असल्याचे दिसते. 23 जानेवारी रोजी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात, स्वबळावर लढण्याबद्दल अधिक स्पष्ट संकेत दिले. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांची तयारी आणि जिद्द पाहूनच मी निर्णय घेईल. मला सूड उगवून घ्यायचा आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर शरसंधान केले, आणि आगामी निवडणुकीत गद्दारांनाही योग्य जागा दाखवून देण्याची प्रतिज्ञा केली. स्वबळावर लढण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण होईल, जो त्यांना आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी कमी येईल. Uddhav Thackeray Maharashtra

मनगटात ताकद लागते, घरी बसून निवडणूक जिंकता येत नाही

ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष नवीन नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या ठाकरे गटाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनी भाषण करतांना म्हटले, “स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून निवडणूक लढवता येत नाही. उद्धव ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर शिंदे गटाने जोरदार टीका केली. पण शिवसेना ठाकरे गटाने जर स्वबळावर निवडणुका लढल्या, तर त्यांना प्रत्यक्षात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. Uddhav Thackeray Maharashtra

ठाकरे गटाला स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा फायदा

ठाकरे गटाच्या स्वबळावर निवडणुका लढण्याच्या निर्णयाचे काही फायदे होऊ शकतात. प्रमुख कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतील त्यांच्या पराभवानंतर, उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक जबरदस्त कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्याच बरोबर विधानसभा निवडणुकीत हि त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने 20 जागा जिंकल्या, आणि त्यात 10 जागा मुंबईत मिळवल्या. यामुळे मुंबईत त्यांच्या समर्थकांची एक शक्ती अस्तित्वात आहे. याच बाबीवर आधारित, उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीत यश मिळवून आपली ताकद सिद्ध करू शकतात.
जर त्यांनी स्वबळावर मुंबई महापालिका जिंकली, तर त्यांची राजकीय स्थिती आणखी बळकट होईल. महापालिका निवडणुकीत जर ठाकरेंना यश मिळाले, तर त्यांना आगामी निवडणुकीत एक मोठा विश्वास मिळेल. Uddhav Thackeray Maharashtra Marathi Manus

स्वबळाच्या नाऱ्यामुळे होतील हे तोटे

Uddhav Thackeray Maharashtra Latest News In Marathi ठाकरे गटाला स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे अनेक संभाव्य तोटे होऊ शकतात. पहिला तोटा म्हणजे कार्यकर्त्यांची अपुरी संख्या. विधानसभा निवडणुकीत, उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यात मुंबईमध्ये 99 नगरसेवकांपैकी 36 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याचप्रमाणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 35 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. यामुळे, ठाकरे गटाच्या पक्षीय बांधणीवर मोठा परिणाम झाला आहे.

Eknath Shinde with Balasaheb Thackeray

आता, शिंदे गट मुंबई महापालिकेसाठी आपले शक्ती प्रदर्शन करत आहेत. त्यांचे तंत्र आणि रणनीती, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रभावित करू शकतात. अशा स्थितीत, ठाकरे गटाला स्वबळावर लढण्यासाठी पुरेशी ताकद मिळणार नाही असे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर, राजकीय विश्लेषक उद्धव ठाकरे यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. 2019 मध्ये, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडीत प्रवेश केला, तेव्हा त्यांच्यावर हिंदुत्वाची तडजोड केल्याचे आरोप झाले. याच वेळी शिंदे गटाचे बंड सुरू झाले. Uddhav Thackeray Maharashtra Latest News In Marathi

संजय राऊत यांच्यावर कार्यकर्ते नाराज

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रोजच नवनवीन दावे, प्रतिदावे अन् टीका करत असतात. व विरोधकांवर आपली तोफ डागत असतात. यातून बऱ्याच वेळा ते अगदी खालच्या पातळी वर जाऊन टीका करतात. त्यामुळे जनमानसात संजय राऊत आणि ठाकरे गट यांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळेच ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते हे सुद्धा नाराज होत आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते ठाकरे गट सोडून भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा मार्ग स्वीकारत आहेत. Sanjay Raut Updates In Marathi

पण सध्या एकनाथ शिंदे आणि भाजप महाराष्ट्रात खूप स्ट्रॉंग बनत चालली आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी ते अग्रेसर आहेत. विशेषता ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते फोडण्यात हे दोन्ही पक्ष आता माहीर झाले आहेत. आणि एकनाथ शिंदे तर ठाकरे गटाचे नेते यांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होत आहेत हे मागील दोन वर्षापासून आपण बघतच आलो आहोत.

तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेत भरघोस मताने आपले उमेदवार निवडून आणले होते. लोकसभेत त्यांचा तर स्ट्राईक रेट भाजप पेक्षाही जास्त होता आणि विधानसभेत सुद्धा त्यांचे आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

त्यांच्यावर टीका होत होती की त्यांनी गद्दारी केली पण त्यांनी ठामपणे दाखवून दिले की आम्ही गद्दारी नाही घेतली तर आम्ही हिंदुत्वासाठी बंड केले आणि ते बंड त्यांनी अगदी यशस्वीपणे पूर्णही केले.

एका शिंदेंनी घेतली होती शपथ

एकनाथ शिंदेनी विधानसभेत शपथ घेतली होती की आमचे आणि भाजपचे मिळून आम्ही 200 आमदार निवडून आणणारच आणि या विधानसभा निवडणुकीत त्यांनी खूप परिश्रम घेऊन भाजप आणि अजित पवार यांच्या एकजुटीने, सहकार्याने महायुतीचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आले. त्यामुळे एकदा शिंदे जे बोलतात तेच करतात असेच पूर्ण महाराष्ट्र वातावरण तयार झाले आहे. Eknath Shinde on Uddhav Thackeray

ठाकरे गट पुन्हा फुटणार

शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्याला बहुतांशी खासदार आणि आमदार अनुपस्थित होते. विशेषतः कोकणातील आमदार, खासदार गैरहजर होते. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा फुटणार अशी जोरदार चर्चा पूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यासोबतच पक्षातील खूप जुने आणि कट्टर शिवसैनिक यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्ष फुटीचा आणि राजीनामांचा हा एक खूप त्रासदायक विषय उद्धव ठाकरे यांना सतावत आहे.

मराठी मतांवर आहे उद्धव ठाकरेंचा डोळा

Uddhav Thackeray Maharashtra स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केला होता व बाळासाहेब यांनी नेहमीच मराठी माणसाचा विचार करूनच हा पक्ष 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या धोरणाखाली चालवला. पण सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांना अस्तित्वाची लढाई लढवावी लागत आहे. महाविकास आघाडीत गेल्यापासून त्यांची राजकीय पडझड चालूच आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे जेणेकरून मुंबईमधील असणारी मराठी मते एकजूट होऊन ते त्यांची मते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देतील आणि पुन्हा एकदा कित्येक वर्षापासून असणारी मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा मिळेल अशी त्यांना आशा आहे.

कारण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर ठाकरेंची शिवसेना फक्त मुंबईतच खूप तळागाळात पोहोचली आहे. त्यांचे कार्यकर्ते, विभाग प्रमुख, गट प्रमुख हे संपूर्ण मुंबईमध्ये कार्यरत आहेत व त्यांची काम ही उल्लेखनीय आहे. त्यामुळे घराघरात शिवसेना हे जणू काय एक नियमच असल्यासारखे आहे. त्याचाच फायदा आपल्या पक्षाला होईल या आशेने त्यांनी हा नारा दिला आहे असेही बोलले जात आहे.

हे हि वाचा :-

एकनाथ शिंदेंच्या मागे एवढी मोठी ताकद कोणाची? तब्बल 2 पालकमंत्री पदाच्या निर्णयाला मिळाली स्थगिती

महादेव मुंडे खून प्रकरण, धनंजय मुंडे समर्थक वाल्मिक कराड पुन्हा अडकला, त्याच्या मुलावरही गंभीर आरोप

WhatsApp Group Join Now

Leave a Comment