नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, 9 ऑगस्ट 2024 ला कोलकातातील आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना घडली होती. 31 वर्षीय ट्रेनी डॉक्टरच्या मृतदेहाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. त्या ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करण्यात आले होते आणि नंतर तिची हत्या केली गेली होती. या घटनेनंतर संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी डॉक्टरांनी आणि डॉक्टर संघटनांनी देशभर आंदोलन सुरू केले. Kolkata Doctor Rape Murder Case Result
आरोपी संजय रॉयच्या विरोधातील ठोस पुरावे
तपासानुसार, संजय रॉयचा या घटनेशी संबंध असणारे अनेक ठोस पुरावे सापडले. सीबीआयने 120 witnesses चे जबाब घेतले होते, तसेच संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्टमध्ये गुन्ह्याची कबूली दिली होती. त्याच्या डीएनएचे नमुने पीडितेच्या शरीरावर आढळले आणि घटनास्थळीही त्याच्या उपस्थितीचे स्पष्ट पुरावे होते. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तसेच त्याच्या ब्लूटूथ हेडफोनसारख्या वस्तू घटनास्थळी आढळल्याचे सादर करण्यात आले. यावरून आरोपी संजय रॉयच्या विरोधात अत्याचार आणि हत्या यासारखे गंभीर आरोप सिद्ध झाले होते. Kolkata Doctor Rape Murder Case Result
सीबीआय आणि कुटुंबीयांची फाशीची मागणी
संजय रॉयला फाशीची शिक्षा देण्यासाठी पिडितेच्या कुटुंबीयांनी तसेच डॉक्टरांच्या संघटनांनी ठाम मागणी केली होती. सीबीआयनेही या प्रकरणाला “रेअर ऑफ रेअर” केस म्हणूत आरोपीला फाशी देण्याची जोरदार मागणी केली. पिडितेच्या कुटुंबीयांचे असे मत होते की, अत्याचार आणि हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळावा, ज्यामुळे समाजात न्यायव्यवस्था आणि सुरक्षेचा संदेश जाईल. या प्रकरणात पिडितेच्या कुटुंबीयांनी न्यायालयात फाशीची मागणी केली होती आणि लोकसमूहानेही संजय रॉयला फाशी देण्यासाठी आवाज उठवला होता. Kolkata Doctor Rape Murder Case Result
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
संजय रॉयच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, आरोपीला सुधारण्याची संधी दिली जाऊ शकते. वकिलांनी कोर्टाला सांगितले की, संजय रॉयच्या वर्तनाचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. त्याला योग्य प्रकारे उपचार देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, संजय रॉयने कोर्टात दिलेल्या जबाबात, त्याने असा दावा केला की त्याला अडकवण्यात आले आहे आणि त्याच्यावर अत्याचार केले गेले. त्याच्या वकिलांनी सांगितले की, त्याच्या आरोपावर ठोस पुरावे नाहीत आणि त्याला सुधारण्यासाठी चांगली संधी दिली जावी. Kolkata Doctor Rape Murder Case Result
कोर्टाचा निर्णय आणि वाद
18 जानेवारी 2025 रोजी कोलकाताच्या सियालदाह कोर्टाने संजय रॉयला दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोर्टाने त्याला 50,000 रुपये दंडही ठोठावले. परंतु, संजय रॉयला फाशी न देण्याच्या निर्णयामुळे पिडितेच्या कुटुंबीयांची आणि डॉक्टरांच्या संघटनांची तीव्र नाराजी व्यक्त झाली. त्यांनी या निर्णयाला विरोध करत, संजय रॉयला फाशी दिली पाहिजे अशी मागणी केली. Trainee Doctor Rape Murder Case Result

त्याचबरोबर, या प्रकरणाच्या तपासावर शंका घेतली जात आहे. पिडितेच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र असंतोष व्यक्त केला.
Kolkata Doctor Rape Murder Case Result सियालदाह कोर्टाने “रेअर ऑफ रेअर” प्रकरण म्हणून ही केस मानले नाही आणि संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने असे सांगितले की, संजय रॉयने गंभीर गुन्हा केला असला तरीही या प्रकरणाला “रेअर ऑफ रेअर” मानले जाऊ शकत नाही. या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की, इतक्या गंभीर आणि क्रूर अपराधावर कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा का दिली?
हे प्रकरण “रेअर ऑफ रेअर” असल्यास त्याला अधिक कठोर शिक्षा का दिली गेली नाही? Kolkata Rape Case
कोलकात्यात तणावग्रस्त परिस्थिती
कोर्टाच्या निर्णयानंतर कोलकातामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. न्यायालयाच्या परिसरात डॉक्टर आणि मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमले होते. पिडितेच्या कुटुंबीयांनी फाशीची शिक्षा न होण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखून संजय रॉयला कडक शिक्षा दिली पाहिजे असा इशारा दिला. याचप्रकारे, पिडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी पाऊले Kolkatta Doctor Rape Murder Case Result उचलली पाहिजेत असे सांगितले.
पुढील कायदेशीर लढाई
कोर्टाच्या या निर्णयानंतर पिडितेच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे. सीबीआयने देखील या प्रकरणावर शंका घेतली आणि अपील करण्याचा विचार केला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर अद्याप अंतिम ठराव आलेला नाही आणि पिडितेच्या कुटुंबीयांनी न्याय मिळवण्यासाठी आणखी कायदेशीर उपाययोजना करण्याची तयारी सुरू केली आहे. Kolkata Doctor Rape Murder Case Result
अशा गंभीर आणि निंदनीय घटनांवर कठोर कारवाई आवश्यक आहे, ज्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा आणि न्याय मिळेल.
बदलापूर अत्याचार प्रकरण अक्षय शिंदेचा Encounter Fake?
बदलापूर अत्याचार प्रकरणाने सध्या राज्यभरात खळबळ माजवली आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एनकाउंटर झाला होता, परंतु आता हा फेक एनकाउंटर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या एनकाउंटरमधील पोलिस अधिकारीच आरोपी बनले असून, त्यांच्यावर कोर्टाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही बातमी मुंबई आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. Badalapur Akshay Shinde Fake Encounter
कोर्टात सादर झालेल्या अहवालाचा धक्कादायक खुलासा
सोमवारी, 20 जानेवारी 2024 रोजी, मुंबई उच्च न्यायालयात अक्षय शिंदेच्या एनकाउंटर बाबत एक धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या या अहवालात पोलिसांच्या एनकाउंटर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अहवालानुसार, अक्षय शिंदेच्या मृत्यूची परिस्थिती खोटी ठरवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला आणि पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला, असा दावा करण्यात आला होता. मात्र, अहवालात अक्षय शिंदेच्या हाताचे ठसे रिव्हॉल्वरवर सापडले नाहीत, जे पोलिसांचा दावा खोटा ठरवत आहे. Badalapur Akshay Shinde Fake Encounter
एनकाउंटरचा बनावटपणा
अहवालानुसार, पोलिसांच्या दाव्याला विरोध केला जात आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी पाच पोलिस कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितलेल्या “आत्मसंरक्षण” या कारणाला कोर्टाने खोटी ठरवले आहे. Badalapur Akshay Shinde Fake Encounter
अत्याचार प्रकरणाची पार्श्वभूमी
बदलापूरच्या आदर्श विद्यालयातील चार आणि सहा वर्षांच्या मुलींवरील अत्याचाराची घटना 2024 च्या ऑगस्ट ते महिन्यात उघडकीस आली होती. शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा अक्षय शिंदे या मुलींवर अत्याचार करत होता. एके दिवशी या मुली शाळेत जायला तयार न झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यातून अत्याचाराची बाब समोर आली. Badalapur Akshay Shinde Fake Encounter
कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली, आणि लोकांचा संताप अधिकच वाढला. Badalapur Fake Encounter
एनकाउंटर आणि त्यानंतरची प्रतिक्रिया
आरोपीच्या कुटुंबीयांनी आरोपी अक्षय शिंदेच्या एनकाउंटरबाबत नाखुश प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अक्षय शिंदेचा एनकाउंटर योग्य नाही. सरकारने त्याला योग्य शिक्षा देण्याची गरज होती, त्याची चौकशी व्हायला हवी होती.
पिडित मुलीच्या कुटुंबीयांनी शाळेच्या ट्रस्टी आणि पोलिसांच्या वागणुकीवर गंभीर आरोप केले आहेत. मुलीच्या आईने सांगितले की, शाळेच्या प्राचार्याने सीसीटीव्ही बंद ठेवले होते आणि पोलिसांनी घटनास्थळावरून सामग्री योग्यरीत्या गोळा केली नाही. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, शाळेच्या ट्रस्टींनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना शाळेची प्रतिष्ठा जपायची होती. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, शाळेचे ट्रस्टी आणि प्राचार्य हे आरोपी अक्षय शिंदेच्या अत्याचाराच्या प्रकरणी संलग्न असू शकतात. Badalapur Akshay Shinde Fake Encounter
आरोपींच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
अक्षय शिंदेच्या एनकाउंटर नंतर, त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूवर शंका उपस्थित केली आहे. अक्षय शिंदेच्या आईने कोर्टात सांगितले की, जर माझ्या मुलावरचे आरोप सिद्ध झाले असते, तर त्याला फाशी दिली जाऊ शकली असती. पण त्याच्या मृत्यूची परिस्थिती खोटी आहे. ती पुढे म्हणाली की, एनकाउंटर ची चौकशी होणं आवश्यक आहे. या कुटुंबीयांनी अक्षयच्या वतीने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे, आणि त्यांना आशा आहे की सत्य समोर येईल. Badalapur Rape Case Fake Encounter
कोर्टाच्या अहवालानंतर, आता पोलिसांच्या फेक एनकाउंटरची चौकशी सुरू होईल का, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या न्यायासाठी पुढे न्यायालयीन कारवाई सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. पोलिसांनी फेक एनकाउंटर केला असल्यास, त्यांना कोणाचा प्रोत्साहन होता याची चौकशी होईल का, हे पाहणे महत्वाचे आहे.
अखेर, बदलापूर अत्याचार प्रकरणात विविध उलटसुलट घटनांमुळे न्याय प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कोर्टाने सादर केलेल्या अहवालामुळे पोलिसांच्या वागणुकीचा उलगडा झाला असून, पुढील काळात या प्रकरणाच्या संदर्भात काय नवीन खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे हि वाचा :-
ऑनलाईन गेममधून जिंकलेले 1 लाख रुपये का घालवले म्हणून सख्या मावस भावाची केली फिल्मी स्टाईल हत्या
फक्त कुंभ मेळ्याला येणारे नागा साधू 12 वर्षे नेमके असतात तर कोठे?