नमस्कार मित्रांनो, सध्या झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने लोक वाईट मार्गाला लागत आहेत. त्यासाठी ते ऑनलाईन गेम्स, फ्रॉड हा मार्ग अवलंबित आहेत, आणि त्यातून मग वाद विवाद, मारहाण, हत्तेचा प्रयत्न आणि खून या गोष्टी सर्रासपणे घडत आहेत. या ऑनलाइन गेम च्या जाळ्यात बहुतांशी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात अडकला आहे. त्यामुळे ते कमावण्याच्या वयात आपल्या जवळचे पैसे घालवत आहेत आणि परिणामी त्यांचे आयुष्य तर उध्वस्त होत आहेतच त्यासोबतच ते कर्जबाजारी सुद्धा होत आहेत आणि पुढे मग या कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणखीन काहीतरी चुकीचा अवैध शॉर्टकट मार्ग अवलंबत आहेत. Murder In Sambhajinagar
त्यातूनच रोज नवनवीन गुन्हे घडत आहेत. अशाच प्रकारचा एक गुन्हा नुकताच घडला आहे. त्यामध्ये आपल्या सख्ख्या मावस भावाने आपल्याच सख्ख्या मावस भावाचा पैशांच्या कारणासाठी काटा काढला आहे ते पण फक्त 50 हजार रुपयांसाठी. ऑनलाइन गेम्सचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडू लागला आहे, आणि त्यात खेळणाऱ्यांमध्ये प्रतिस्पर्धा आणि ताण निर्माण होत आहे. त्याचाच एक भयानक परिणाम एक तरुणाच्या मृत्यूच्या रूपात समोर आला आहे. एका भयानक हत्येचा तपास करत असताना पोलिसांना समजले की, दोन मावस भावांमध्ये ऑनलाइन गेममुळे झालेला वाद आणि आर्थिक नुकसान यामुळे एका युवकाचा जीव गेला. चला तर, या धक्कादायक घटनेचा तपशिल जाणून घेऊया. Murder In Sambhajinagar
हा संपूर्ण प्रकार 14 जानेवारी 2025 रोजी घडला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रदीप विश्वनाथ निपटे आहे, आणि तो 19 वर्षांचा एक हुशार विद्यार्थी होता. प्रदीप बीएससी च्या शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होता. त्याचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील पिंपतखेड होते. प्रदीप सहा वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण घेत होता आणि त्याने या शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. प्रदीप त्याच्या चार मित्रांसोबत उस्मानपुरातील रेड कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहत होता. Murder In Sambhajinagar
घटना घडलेल्या रात्री सायंकाळी सर्व रूम पार्टनर्स कामानिमित्त बाहेर गेले होते. प्रदीप एकटा असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. रात्री 10 वाजता जेव्हा बाकीचे मित्र खोलीवर आले, तेव्हा प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. Murder In Sambhajinagar
ऑनलाईन गेम मुळे झाला होता वाद
प्रदीप आणि त्याचा मावस भाऊ एकाच खोलीत राहायचे आणि दोघांनाही ऑनलाईन गेम खेळण्याची आवड होती. यामध्ये मावस भाऊने सुमारे एक लाख रुपये जिंकले होते, परंतु प्रदीपने त्या पैशापैकी पन्नास हजार रुपये गमावले होते. या ५०,००० रुपयांच्या नुकसानावरून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. मावस भावाच्या मनात प्रदीपने पैसे घालवले म्हणून राग निर्माण झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. त्याच कारणामुळे भावाने आपल्याच भावाच्या हत्येचा कट रचला. Murder In Sambhajinagar
भाऊच बनला वैरी
14 जानेवारी रोजी संक्रांतीच्या दिवशी प्रदीप एकटा असताना मावस भावाने त्याच्यावर धारदार शस्त्राने 17 वेळा वार केले. त्या हल्ल्यामुळे प्रदीपाचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर मावस भावाने प्रदीपच्या शवाला गादीवर झोपवून त्याच्यावर पांघरून ठेवले. त्याने हा बनाव केला की प्रदीप झोपला आहे.

हत्येनंतर तो निघून गेलाही. त्यानंतर त्याने एक प्रकारचा ‘क्राइम सीन’ तयार केला आणि पतंग उडवायला गेला. त्याने पोलिसांसोबत देखील शव विच्छेदन गृहात जाऊन प्रदीपच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्याचे नाटक केले.
पोलिसांचा भावावर होता संशय
याप्रकरणी पोलिसांनी तपास चालू केला आणि प्रदीपच्या मित्रांची व मावस भावाची चौकशी केली. त्यातच त्यांना मावस भावावर संशय आला. यामध्ये त्याच्या आणि प्रदीपच्या आर्थिक व्यवहारांचा उलगडा झाला. दोघांमध्ये ऑनलाइन गेममुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे वाद सुरू होते, हे पोलिसांना समजले.
आरोपीने वेळोवेळी त्याचे जबाब बदलले. पहिल्यांदा तो पोलिसांसमोर प्रदीपच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत असला तरी, नंतर त्याने गुन्हा कबूल केला. मावस भावाने सांगितले की, प्रदीपने त्याचे ५०,००० रुपये गेम मध्ये घालवले आणि यावरूनच त्याने खून करण्याचा निर्णय घेतला.
ऑनलाइन गेममध्ये पैसे जिंकणे आणि हरवणे ह्यामुळे होणाऱ्या मानसिक ताणतणावामुळे अनेक तरुणांमध्ये हिंसक प्रवृत्ती निर्माण होऊ लागली आहे. कधी कधी एखादी छोटी गोष्ट म्हणजेच आर्थिक नुकसान देखील, एका युवकाच्या जीवनाचा अंत करू शकते.
बीडमध्ये आणखी एक हत्या, खरंच बीड चा बिहार झालाय काय?
Murder In Beed बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हातोळण गावात राहणारे अजय भोसले, कृष्णा भोसले आणि भरत भोसले हे तिघेही सख्खे भाऊ गुरुवारी श्री तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांची गाडी वाहिरा गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आली असता त्यांना एका व्यक्तीने गाडी थांबवून त्यांच्याकडून लिफ्ट मागितली. त्याने सांगितले की, तोदेखील त्याच दिशेने जात आहे आणि त्याला सोडण्याची विनंती केली. गाडीत जागा नसल्यानं भोसले बंधू आणि त्यांच्या मित्रांनी त्याला नकार दिला. मात्र, हा सगळा प्रकार एक योजना होती. त्याच वेळी अंधारात लपलेले २५ ते ३० हल्लेखोर बाहेर आले आणि त्यांनी भोसले बंधूंवर हल्ला केला. Beed Walmik Karad Dhananjay Munde
हा हल्ला लाकडी काठी, कुऱ्हाड, चाकू आणि लोखंडी पाईप यांसारख्या हत्यारांनी केला गेला. अजय आणि भरत भोसले यांचा मृत्यू झाला, तर कृष्णा भोसले गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर भोसले कुटुंबीयांनी टाहो फोडला आणि न्यायाची मागणी केली. Beed Walmik Karad Dhananjay Munde
तपासात असे समोर आले आहे की, भोसले बंधू आणि आरोपी यांच्यात काही कारणांमुळे वाद झाले होते. विशेषतः, दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणांच्या कारणावरून हा हल्ला घडला असावा असा संशय आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर, भोसले बंधू आणि आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला होता. Beed Walmik Karad Dhananjay Munde
या हल्ल्यात भाग घेतलेल्या आरोपींचे पारधी समाजाशी संबंध होते, आणि ते सराईत गुन्हेगार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावावर सोलापूर, नगर आणि इतर ठिकाणी जबरी चोरी आणि दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. Murder In Beed
या हल्ल्याच्या तपासात आंबोरा पोलीस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना 307 (जिवे ठार मारण्याचा प्रयत्न) आणि 302 (खून) कलमांनुसार आरोपी करण्यात आले आहेत. हल्ल्यातील इतर आरोपींचा तपास चालू आहे. Santosh Deshmukh Beed Murder
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था
मित्रांनो गेल्या दीड दोन महिन्यापासून बीड जिल्हा सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये असे बोलले जात आहे की बीडचा बिहार झाला आहे की काय. कारण रोजच बीडमध्ये मारामारी, खून अवैध धंदे यासारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाल्मीक कराड याचे प्रकरण ताजे असतानाच आता बीडमध्ये आणखीन एक भयंकर घटना प्रकार समोर आली आहे. Santosh Deshmukh Beed Murder
20 ते 25 जणांच्या टोळक्याने रात्री गाडीवर हल्ला करून दोन युवकांचा जीव घेतला त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेमुळे बीड जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाच नाही अशी भावना सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. यासाठी काही राजकीय मंडळी कारणीभूत आहेत असेही बोलले जात आहे. बीड जिल्ह्यात हत्यांच्या वाढत्या घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्याच्या विविध शहरांमध्ये खंडणी, अवैध राखेचा व्यवसाय, आणि इतर गुन्हेगारी प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Santosh Deshmukh Beed Murder
संतोष देशमुखांच्या हत्येने राज्यभर गदारोळ उडवला आहे आणि या प्रकरणामध्ये आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याचवेळी, भोसले बंधूंच्या हत्येने एक नवा वाद निर्माण केला आहे. कुटुंबीयांनी न्यायासाठी आंदोलन सुरू केले आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. Santosh Deshmukh Beed Murder
आष्टीतील भोसले बंधूंच्या हत्येने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि त्यासोबतच कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. या अशा घटनेने जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रकरणे एक नवीन वळण घेत आहेत. Santosh Deshmukh Beed Murder
हे हि वाचा :-
फक्त कुंभ मेळ्याला येणारे नागा साधू 12 वर्षे नेमके असतात तर कोठे?
झोमॅटो बॉय बनून आले आणि तब्बल १५० हिरे, 86 तोळं सोन्याचे दागिने आणि ३.५ किलो चांदीची केली चोरी