एकनाथ शिंदेंच्या मागे एवढी मोठी ताकद कोणाची? तब्बल 2 पालकमंत्री पदाच्या निर्णयाला मिळाली स्थगिती | Eknath Shinde Power

WhatsApp Group Join Now

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना शिंदे गटाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी असलेल्या सहकार्यामुळे शिंदे आणि त्यांचा गट प्रदेशातील राजकारणात प्रभावी ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी 2025 च्या सुरुवातीलाच आपली बार्गेनिंग पॉवर सगळ्यांना दाखवून दिली.18 आणि 19 जानेवारीच्या घटना त्यानंतरच्या चर्चांमुळे शिंदेंची राजकीय कुवत आणखी स्पष्ट झाली आहे. त्यांनी फडणवीस आणि भाजपला कसे दबावाखाली आणले, आणि पालकमंत्रीपदावर आपला प्रभाव कसा पाडला, हे खालील बातमीमध्ये पाहूया. Eknath Shinde Power

डायरेक्ट दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला मिळाली स्थगिती Eknath Shinde Power

महाराष्ट्राच्या राजकारणात रायगड आणि नाशिक हे दोन महत्त्वाची जिल्हे आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते की या जिल्ह्याच्या पालकमंत्री आपलाच आमदार असावा. यावेळी रायगड जिल्ह्यासाठी आदिती तटकरे यांची पालकमंत्री पदासाठी निवड झाली. तर गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी निवड झाली. Eknath Shinde Power

पण या निवडीला एकनाथ शिंदे गटाने प्रचंड विरोध केला, विरोध एवढा होता की भाजपला या दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगितीच द्यावी लागली.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला नेमकी का मिळाली स्थगिती?

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावे अशी भूमिका पालकमंत्री निवडीच्या आधीच शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी घेतली होती. आणि निवडणुकीचा अनुभव आणि वयानुसार त्यांनाच पालकमंत्री पद मिळणार हे निश्चित झाले होते पण अचानकपणे राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यात आले.

त्यामुळे शिवसेना गट आणि गोगावले समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले. आणि गोगावले समर्थक यांनी तर जाहीर करून टाकले की आमचा राजकीय अस्त जरी झाला तरी आम्ही तटकरे कुटुंबीयांना कधीही स्वीकारणार नाही. त्यामुळेच भविष्यातील धोका पाहून भाजपने या निवडीला स्थगिती दिली. Eknath Shinde Power

हे आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळण्याचे कारण

ज्याप्रकारे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद होता, त्याचप्रमाणे नाशिकच्या ही पालकमंत्री पदाचा वाद निर्माण झाला होता. नाशिक मध्ये शिवसेना गटाचे आमदार दादा भुसे यांचे नाशिक जिल्ह्यात एक हाती वर्चस्व आहे. कित्येक वर्षापासून ते लोकप्रतिनिधी या नात्याने नाशिकची धुरा सांभाळत आहेत. आणि त्यांनी या अगोदर सुद्धा पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी योग्यरीत्या पार पडली होती. त्यामुळे यंदा सुद्धा पालकमंत्री पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार हे वाटत असतानाच भाजपने या ठिकाणी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना पालकमंत्री करून एक डाव खेळला. Eknath Shinde Power

WhatsApp Group Join Now
Eknath Shinde Power

पण शिवसेना शिंदे गटाने आक्रमकपणे आपली भूमिका मांडून व महाजन यांना विरोध करून त्यांचा हा डाव पलटवला. परिणामी भाजपला या ठिकाणी सुद्धा पालकमंत्री पदाला स्थगिती द्यावी लागली

2027 ला नाशिक मध्ये होणारा कुंभमेळा, त्यामुळेच पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच

यावर्षी प्रयागराज येथे होणाऱ्या 45 दिवसांच्या महा कुंभमेळ्याचे आकर्षण पूर्ण जगाला आहे. जगभरातून लाखो भाविक या कुंभमेळ्याला येत आहेत. त्याचमुळे 2027 ला होणाऱ्या नाशिक येथील कुंभमेळ्याची तयारी आतापासूनच राजकीय मंडळी चालू करत आहेत. 2027 ची कुंभमेळ्याची भव्यता आणि त्यातून आपली वाढणारी ताकद हेरूनच प्रत्येक पक्षाच्या आमदाराला वाटत असते की आपणच पालकमंत्री व्हावे. यासाठीच नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच होत आहे. त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे यांनी जोरदार आणि आक्रमकपणे विरोध करून ही स्थगिती मिळवून घेतली. Eknath Shinde Power

एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचे जबरदस्त बॉण्डिंग

राजकारणात असेही म्हटले जात आहे की, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची मैत्री खूप आपुलकीची आहे. त्यामुळेच अमित शहा एकनाथ शिंदे यांना शक्यतो नाराज करत नसतात. त्यामुळेच अमित शहा यांनी रायगडा आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला तूर्ताच स्थगिती देऊन शिंदेचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. Eknath Shinde Power

Eknath Shinde with Amit Shah

तसेच येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. म्हणूनच मुंबई शहराचे पालकमंत्री पद भाजपकडे न ठेवता त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे आणि त्यातून एकनाथ शिंदे ठाकरे यांच्या सत्तेला सुरुंग लावतील अशी अपेक्षा भाजपला आणि अमित शहा यांना आहे.

आक्रमक नेतृत्व: शिंदेचं दबावतंत्र

महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ शिंदे हे एक आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात. विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्यता स्पष्ट झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने देखील भाजपच्या मुख्यमंत्रीपदाला आपला पाठिंबा असल्याचे संकेत दिले होते, परंतु एकनाथ शिंदे यांनी आक्रमकपणे मुख्यमंत्रीपद आपल्या गटाकडे राखण्याची मागणी लावून धरली. Eknath Shinde Power

त्यांच्या आक्रमकतेचे एक ठळक उदाहरण म्हणजे, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांची मागणी. भाजपने सुरुवातीला ही महत्त्वाची खाती आपल्या ताब्यात ठेवायची योजना केली होती, पण शिंदेंनी त्यावर कधीही तडजोड केली नाही. त्यांना नगरविकास खातं मिळालं. यामुळे शिंदेंच्या नेतृत्वाची आणि दबाव आणण्याची क्षमता अधिक मजबूत झाली.

दिवसेंदिवस शिवसेना स्ट्रॉंग होत आहे Eknath Shinde Strong Than Uddhav Thackaray

19 जानेवारीला पालकमंत्रीपदावरून दोन नेत्यांची नियुक्ती होण्याआधीच, शिंदेच्या गटाने आपल्या नाराजीचा सूर लावला. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेना गटातील आमदारानी जोरदार प्रयत्न केले. व महायुतीत मिठाचा खडा पडतो की काय असे वाटू लागले. शिवसेनेच्या दुसऱ्या फळीने विरोधात जाऊन जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आणि हे दाखवून दिलं की शिंदेच्या नेतृत्वाखालील गट कधीही तडजोड करण्यास तयार नाही. Eknath Shinde Power

या विरोधाचा दबाव सरकारवर पडला आणि नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची केलेली नियुक्ती स्थगित करण्यात आली. यामुळे शिंदेंचा दबाव आणखी प्रभावी ठरला, आणि त्यांनी भाजपसोबत आपल्या मागण्या मान्य करवून घेतल्याचे दिसून आले.

येणाऱ्या निवडणुकांमुळे एकनाथ शिंदेंना बळ दिले जात आहे Eknath Shinde Power

एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, महायुतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व मिळवण्याचे टार्गेट ठेवले गेले आहे. मुंबई, ठाणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये शिंदेंचा प्रभाव प्रस्थापित झाला आहे. भाजपला या ठिकाणी शिंदेंच्या मदतीची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदेच्या गटाच्या प्रभावाचा फायदा करून भाजपचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आणण्याची भाजपची योजना आहे.

याच कारणामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला शिंदेंची मदत आवश्यक ठरणार आहे. ठाकरे गटाला रोखण्यासाठी शिंदेंची साथ महत्त्वाची आहे. कारण ठाकरेंनी जर या निवडणुकीत मराठी माणसांचे नरेटिव्ह उभं केलं, तर भाजपला त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिंदेंची मदत आवश्यक होईल. शिंदेंचा स्थानिक वट आणि कणखर नेतृत्व या बाबी भाजपला मुंबईत विजय मिळवून देऊ शकतात.

मराठा आणि ओबीसी राजकारणातील ताकद

शिंदे यांच्या राजकीय प्रभावाचा दुसरा महत्त्वाचा अंग आहे त्यांचा मराठा आणि ओबीसी समुदायातील प्रभाव. शिंदे हे मराठा समाजाचे एक महत्त्वाचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. भाजपच्या रणनीतीनुसार, मराठा समुदायाच्या आधारावर शिंदेचं समर्थन अनिवार्य ठरते. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांदरम्यान, शिंदे यांचा गट त्याच्या प्रभावी नेतृत्वामुळे महत्त्वाच्या ठिकाणी वर्चस्व राखू शकला आहे.

शिंदे यांचा हा प्रभाव लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप साठी महत्त्वपूर्ण ठरला आहे, कारण मराठा आणि ओबीसी समाजाच्या आधारावरच महाराष्ट्रातील राजकारण घडत असते.

शिंदेंची बार्गेनिंग पॉवर

महाराष्ट्रातील राजकारणात शिंदेंचा दबाव आणि बार्गेनिंग पॉवर या गोष्टी स्पष्टपणे दिसून येत आहेत. भाजप विधानसभा निवडणुकीत बहुमताच्या खूपच जवळ असली तरी, त्यांना शिंदेच्या गटाशी सलोखा राखणे महत्वाचे ठरणार आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर शिंदे आणि त्यांचा गटच भाजपला आवश्यक आहेत.

केंद्र सरकारमध्ये शिंदेची शिवसेना भाजपच्या तिसऱ्या क्रमांकाच्या मित्रपक्षाच्या रूपात काम करत आहे. तरीही, शिंदे यांचे दबावाचे राजकारण राज्य स्तरावर प्रभावी ठरत आहे. भाजप शिंदेंना नाराज करू इच्छित नाही, कारण त्यांची जनमानसात असलेली चांगली ओळख आणि स्थानिक ताकद यामुळे, शिंदे यांना भाजप बळ देत आहे.

एकनाथ शिंदे यांनी बार्गेनिंग पॉवरद्वारे आणि राजकारणातील दबावाने त्यांचा प्रभाव कायम राखला आहे. शिंदेंनी एक नवा लीडरशिप पॅटर्न स्थापित केला आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावर देखील त्यांचा दबाव स्पष्ट दिसून आला आहे. शिंदेंच्या राजकीय शैलीत आक्रमकता, दबाव, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी असलेले महत्त्व यामुळे त्यांनी बार्गेनिंग पॉवर कायम ठेवली आहे.

हे हि वाचा :-

कोलकत्ता डॉक्टर अत्याचार प्रकरणी फाशी का सुनावली नाही, जन्मठेप का दिली?

मजूर झाला लखपती..! खाणीत सापडला तब्बल 80 लाखांचा हिरा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment