एकाच कुटुंबातील तब्बल 17 जणांचा मृत्यू । 17 People Deaths In Jammu Kashmir

WhatsApp Group Join Now

17 People Deaths In Jammu Kashmir जम्मू-काश्मीरच्या स्वर्गीय प्रदेशात एक नवे संकट उभे राहिले आहे. काश्मीरच्या राजवरी जिल्ह्यातील बोधल गावात काही दिवसांपूर्वी एक भयंकर घटना घडली, ज्या घटनेने संपूर्ण जनतेच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तर एका घरातल्या १७ लोकांचा मृत्यू झाला, आणि याच्याशी संबंधित तपास आजही सुरू आहे. या मृत्यूंचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही, ज्यामुळे अनेक शंका आणि वाद निर्माण झाले आहेत.

नेमकी काय आहे घटना

बोधल गावात ५ डिसेंबरला एक दुखद घटना घडली. फजल हुसेन, मोहम्मद रफीक, आणि मोहम्मद असलम या तिघांच्या कुटुंबांत एकाच वेळी ५ जणांचा मृत्यू झाला. फजल हुसेन आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या कार्यक्रमात जेवण केलं होतं, आणि त्यानंतर ४० वर्षीय फजल हुसेन आणि त्याच्या ४ मुलांना ताप, उलट्या, पोट दुखणं आणि चक्कर येण्यासारखी लक्षणं दिसली. काही दिवसांतच फजल आणि त्याच्या मुलांचे मृत्यू झाले. तर चार-पाच दिवसांत या कुटुंबातील इतर सदस्यांसोबतच दुसऱ्या कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. १२ जानेवारीला याच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला होता. 17 People Deaths In Jammu Kashmir

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अनेक तज्ञांची टीम बोधल गावात पोहोचली आहे. ३५०० लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये अन्न, पाणी, पर्यावरण, रक्त आणि प्लाज्मा नमुने तपासले गेले आहेत. एका प्रमुख तपासामध्ये पाण्याची चाचणी घेतली गेली, कारण गावकऱ्यांना शंका होती की पाण्यात कीटकनाशक मिसळले असू शकते. पण या तपासांमधून कोणताही विषाणू किंवा बॅक्टेरिया सापडला नाही. 17 People Deaths In Jammu Kashmir

न्यूरोटॉक्सिन आणि मेंदूतील समस्या

तज्ञांनी सांगितले की, मृतांमध्ये एमआरआय स्कॅनच्या आधारावर मेंदूतील ओएडेमा आढळले आहे. ओएडेमा म्हणजे मेंदूमध्ये द्रव्याचं प्रमाण वाढणं. यावरून शंका व्यक्त केली जात आहे की, या मृत्यूच्या कारणामागे न्यूरोटॉक्सिन असू शकतो, जो मेंदूला इजा पोहचवतो. सध्याच्या परिस्थितीत, यावर शिक्कामुर्तब केलेलं नाही आणि तपासात अजून थोडं तज्ञांच्या विचारानुसार यामध्ये काही द्रव्याचा किंवा बाह्य घटकांचा परिणाम होऊ शकतो, परंतु याबाबत अधिक प्रमाणित निष्कर्ष प्राप्त झालेले नाहीत. 17 People Deaths In Jammu Kashmir

या घटनेनंतर, बोधल गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक एकमेकांशी बोलायलाही घाबरत आहेत. एकाच कुटुंबातील इतक्या जणांचा मृत्यू होणं, आणि त्या मृत्यूचे कारण अजून अस्पष्ट असल्यानं गावात तणाव निर्माण झाला आहे. गावकऱ्यांच्या मनात शंका आहे की यामध्ये जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचा काहीतरी संबंध असावा. काहींनी यावर शंका घेतली की, कदाचित कुटुंबातील कोणीतरी वादातून किंवा दुसऱ्या कोणाच्या मदतीने हे घडलं असेल. 17 People Deaths In Jammu Kashmir

WhatsApp Group Join Now
17 People Deaths In Jammu Kashmir

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेला गांभीर्याने घेतलं असून, सरकारने याच्या तपासासाठी एक इंटरमिनिस्ट्रियल समिती स्थापन केली आहे. यामध्ये विविध तज्ञांचा समावेश आहे आणि यांचा मुख्य उद्देश मृत्यूच्या कारणांचा तपास करण्याचा आहे. यावर आरोग्य मंत्री यांनी सांगितलं की, ३५०० लोकांची तपासणी करण्यात आली आहे, पण अजूनही स्पष्ट कारण समोर आलेलं नाही. याचबरोबर, एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) ची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामध्ये विशेष तज्ञांचा समावेश आहे. आणि लवकरात लवकर यावर मार्ग काढून उपाय योजना करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. 17 People Deaths In Jammu Kashmir

तर पुण्यात ग्विलियन बॅरो सिंड्रोमचा वाढता धोका: 70 हून अधिक जणांना झाली लागण

GBS Disease In Pune पुण्यात गेल्या काही आठवड्यांमध्ये ग्विलियन बॅरो सिंड्रोम (GBS) च्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या आजारामुळे स्थानिक प्रशासन आणि रुग्णालयांनी सतर्कतेचे इशारे दिले आहेत. पुण्याच्या विविध भागांत आणि पिंपरी चिंचवडमध्ये या आजारामुळे 70 हून अधिक जणांना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः दूषित पाणी आणि अन्नामुळे हा रोग पसरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, पुण्यात एका 64 वर्षीय महिलेच्या मृत्यूने प्रशासन खूपच ऍक्टिव्ह झालं आहे.

ग्विलियन बॅरो सिंड्रोम (GBS) काय आहे?

ग्विलियन बॅरो सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आणि गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे. जो शरीराच्या प्रतिकारशक्तीला पेरिफेरल नर्व्हस सिस्टीमवर हल्ला करण्यास प्रवृत्त करतो. या सिंड्रोममध्ये शरीराचे नर्व्हस सिस्टीम संक्रमित होते, ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपासून मेंदूपर्यंत आणि तिकडून शरीरातील अवयवांपर्यंत माहिती पोहोचवण्यात अडचणी येतात. 1916 मध्ये या सिंड्रोमचे पहिले दोन रुग्ण आढळले होते, आणि त्यानंतर त्याचे संशोधन सुरू झाले. GBS Disease In Pune

GBS हा एक ऑटोइम्यून विकार आहे. म्हणजेच, शरीराची प्रतिकारशक्ती शरीराच्या स्वतःच्या च्याच पेशींवर हल्ला करते. याचे कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, परंतु इन्फेक्शन किंवा इतर गंभीर आजारांनंतर याचा प्रकोप होतो. पुण्यातून आलेल्या माहितीवरून असे दिसून येते की, दूषित पाणी आणि अन्न हे याचे प्रमुख कारण असू शकतात. GBS Disease In Pune

GBS चे लक्षणे काय आहेत?

GBS च्या लक्षणांची सुरुवात साधारणपणे अशक्तपणा आणि पायांमध्ये मुंग्या येण्यापासून होते. नंतर हळूहळू हे लक्षण हातांमध्ये आणि चेहऱ्यावरही दिसून येते. काही रुग्णांमध्ये पॅरालिसिस (पक्षाघात) होण्याचा धोका असतो. श्वास घेण्यात अडचणी, धाप लागणे आणि बोलताना किंवा अन्न गिळताना त्रास होणे ही इतर लक्षणे आहेत. यापैकी काही रुग्णांमध्ये छातीच्या मसल्सवर परिणाम होतो, ज्यामुळे श्वास घेण्यात आणि बोलण्यात अडचण येऊ शकते. GBS Disease In Pune

GBS होण्याची कारणे

GBS एक सेकंडरी आजार आहे, ज्याचा प्रकोप इतर काही आजारांनंतर होतो. बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन्स हे त्याचे मुख्य कारण आहेत. विशेषतः कंपायलोबॅक्टर जेजुनी जिवाणू आणि नोरो व्हायरस या दोन्ही कारणांमुळे GBS होऊ शकतो. दूषित अन्न आणि पाणी यामुळे याचा प्रसार होतो. पुण्यातील काही रुग्णांना दूषित पाणी पिल्यानंतर उलट्या आणि जुलाबाच्या समस्या आल्या होत्या, आणि त्यानंतर त्यांना GBS ची लक्षणे दिसू लागली. GBS Disease In Pune

GBS ची उपचार पद्धती

GBS चे उपचार मुख्यतः लक्षणांच्या आधारावर केले जातात. या आजाराच्या उपचारासाठी इम्युनोथेरपी आणि रिहॅबिलिटेशन आवश्यक असतात. साधारणतः GBS च्या रुग्णांना इम्युनोथेरपी दिली जाते, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढीस मदत होते. काही रुग्णांना पेरिफेरल नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झाल्यामुळे, मसल मोमेंट रिस्टोर करण्यासाठी रिहॅबिलिटेशन दिले जाते. GBS Disease In Pune

GBS संदर्भातील सतर्कता आणि सुरक्षितता

पुण्यात GBS चे रुग्ण वाढत असतानाही, आरोग्य विभागाने लोकांना स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत काही महत्त्वाचे मार्गदर्शन दिले आहे. नागरिकांना घरात आणि परिसरात स्वच्छता राखण्याचा आणि दूषित अन्न, पाणी टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. लोकांनी उकळून पाणी प्यावे आणि बाहेरचे अन्नपदार्थ टाळावेत. याशिवाय, आरोग्य विभागाने क्लोरीनयुक्त पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. GBS Disease In Pune

तसंच, GBS ची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्वरित उपचार घेणे महत्त्वाचे आहे. रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना, लोकांनी आरोग्य यंत्रणेला याबाबत माहिती द्यावी. पुण्यातील अधिकाऱ्यांनी यावर तत्परतेने लक्ष दिले आहे, आणि याबाबतच्या अचूक तपासणीसाठी तज्ञांची समिती स्थापन केली आहे. GBS Disease In Pune

हे हि वाचा :-

तब्बल 14 जणांची हत्या करून मृतदेहाच्या मेंदूचं सूप करून पिले

स्वबळाचा नारा उद्धव ठाकरेंसाठी फायद्याचा कि तोट्याचा?

WhatsApp Group Join Now

Leave a Comment