नमस्कार मित्रांनो, 2023 साली 22 ऑक्टोबरला परळीमध्ये महादेव मुंडे नावाच्या दूध व्यवसायिकाची हत्या झाली होती. या हत्येची तपासणी सुरू असतानाही आता दीड वर्षानंतर परत एकदा ही घटना चर्चेत आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलावर महादेव मुंडे यांच्या हत्येशी संबंधित गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे कराड कुटुंब आणि त्यांच्याशी संबंधित अनेक राजकीय व गुन्हेगारी कनेक्शन्स उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, पोलिस अधिकारी राजेश पाटील यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याने आणखी एक मोठा वाद निर्माण झाला आहे. Walmik Karad News In Marathi
नेमके काय आहे महादेव मुंडे हत्याप्रकरण?
महादेव मुंडे हे कनेरवाडी येथील दूध व्यवसायिक होते. 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळीच्या वनविभाग कार्यालयाच्या आवारात त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले होते. तीन महिन्यांनंतर, 16 जानेवारी 2024 रोजी नागरिकांनी परळी शहर बंदचा इशारा दिला आणि यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. तरीही, हत्येच्या तपासात योग्य ती कारवाई न झाल्यामुळे, भाजपा आमदार सुरेश धस यांनी या हत्येच्या संदर्भात कराड गँग वर गंभीर आरोप केले आहेत. Walmik Karad News In Marathi
हे आहेत सुरेश धस यांनी केलेले आरोप
सुरेश धस यांनी आपल्या आरोपांमध्ये म्हटलं आहे की, वाल्मिक कराड आणि त्याचे कुटुंबीय या हत्येतील आरोपींच्या आसपास फिरत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, महादेव मुंडे यांचे हत्येचे आरोपी माहिती असतानाही त्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नाही. धस यांच्या आरोपांनुसार, “आका” नावाच्या व्यक्तीने या आरोपींना संरक्षण दिले आहे. या आरोपामुळे एक नवे वादंग निर्माण झाले आहे. अणि कराड कुटुंबाच्या अडचणी वाढल्याचं दिसून येत आहे. Suresh Dhas on Walmik Karad
PSI राजेश पाटील यांचा संबंध
सुरेश धस म्हणतात की, विष्णू चाटेच्या ऑफिस मधून घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे की केज पोलिस ठाण्याचे पीएसआय राजेश पाटील उपस्थित होते. या फुटेजमध्ये इतर आरोपींनी खंडणीची मागणी करतांना पीएसआय राजेश पाटील तेथे उपस्थित होते, त्यामुळे ते ही अडचणीत आले आहेत. यावरून अनेकांना प्रश्न निर्माण झाला आहे की राजेश पाटील यांची भूमिका आणि त्यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग काय आहे? पण या प्रकरणामुळे मात्र पोलीस दलात खळबळ माजली आहे. Walmik Karad News In Marathi

खंडणी प्रकरण आणि व्हिडिओ पुरावे
ताज्या अपडेटनुसार, विष्णू चाटेच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. या फुटेजमध्ये खंडणी मागण्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि पीएसआय राजेश पाटील यांचा समावेश दिसतो.
कराड कुटुंबाच्या अडचणी आणखीन वाढणार Walmik Karad News In Marathi
वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलावर होणाऱ्या आरोपांच्या संख्येत वाढ झाली आहे. सुरेश धस यांच्या आरोपानुसार, कराड कुटुंबाचे अनेक गुन्ह्यांमध्ये हस्तक्षेप असून ते या कृत्यांना पाठिंबा देत आहेत. कराड कुटुंबावर आधीच बेकायदेशीर खंडणी मागितल्याचे आरोप होते. यामुळे येणाऱ्या काळात, कराड कुटुंब आणि पीएसआय राजेश पाटील यांची अडचण अधिक वाढण्याची शक्यता आहे. Walmik Karad News In Marathi
सुरेश धस यांनी केलेले आरोप, खंडणी प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांची भूमिका यामुळे हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचे बनले आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणातील नवीन खुलासे: सीसीटीव्ही फुटेज मुळे आरोपींच्या अडचणी वाढल्या Walmik Karad News In Marathi
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्येची झाली, त्यानंतर राज्यात मोठा उद्रेक झाला. ठीक ठिकाणी सर्वपक्षीय मोर्चे निघाले आणि त्यानंतर अनेक आरोपींना अटक करण्यात आली. परंतु या प्रकरणात आता एक नवीन आणि धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामुळे हत्येच्या कटाची गूढता अजूनच वाढली आहे. Walmik Karad News In Marathi
हे फुटेज 29 नोव्हेंबर 2024 च्या दिवशीचे विष्णू चाटेच्या कार्यालयातील आहे, ज्यामधे संतोष देशमुख यांची हत्या करणारे प्रमुख आरोपी दिसत आहेत.
यामध्ये वाल्मिक कराडसह, आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे साथीदार दिसले. याशिवाय, संतोष देशमुख हत्येप्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी, निलंबित पोलीस अधिकारी पीएसआय राजेश पाटील हे देखील या फुटेजमध्ये दिसले. यामुळे हत्येतील आरोपी आणि खंडणी मागणारे सर्व आरोपी एकाच ठिकाणी एकत्र आले होते, असा निष्कर्ष काढला जात आहे. Walmik Karad News In Marathi
PSI राजेश पाटील यांच्या सहभागाचा तपास
संतोष देशमुख हत्येप्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश पाटील यांचा समावेश असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यापूर्वी 8 डिसेंबर 2024 रोजी, राजेश पाटील यांची विष्णू चाटे सोबत हॉटेलमध्ये भेट झाली होती, याचेही व्हिडिओ समोर आले होते. Walmik Karad Vishnu Chate and PSI Rajesh Patil
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. यापूर्वी, विष्णू चाटेने आपल्या साथीदारां च्या साथीने आवादा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितली होती. आवादा कंपनीने त्याला नकार दिल्यानंतर, चाटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावले होते. याच वादानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली.
संतोष देशमुख हत्येप्रकरणात सीआयडी आणि एसआयटी तपास करत आहेत. त्यांना खंडणी आणि हत्या प्रकरणाशी संबंधित एक महत्त्वाचा पुरावा मिळाला होता. या पुरव्यामुळे, वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि इतर आरोपी एकाच गटाचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. Walmik Karad News In Marathi
भाजप आमदार सुरेश धस यांनी यावर मत व्यक्त केले की, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या व्यक्ती दिसत आहेत, ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहेत. त्यांनी दावे केले आहेत की हे आरोपी मकोका (MCOCA) अंतर्गत अटकेत असावे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी या प्रकरणातील पोलिस अधिकारी पाटील यांना सहआरोपी बनवण्याची मागणी केली आहे.
पोलिसांवर सामाजिक आणि राजकीय दबाव
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे तपास यंत्रणा प्रचंड दबावाखाली आहेत. राजकीय नेत्यांची या प्रकरणात असलेली भूमिका देखील तपासली जात आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची आणि हत्येतील आरोपींवर कडाक कारवाई करण्याची विनंती केली आहे. Suresh Dhas on Walmik Karad
जरांगे पाटील यांचे आरोप आहेत की, खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात आरोपींना पळवून जाण्यास मदत करणारे काही राजकीय मंडळी आहेत आणि त्यामुळे या प्रकरणाची सखोल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी आरोप केला आहे की, विष्णू चाटे आणि त्याचे साथीदार खंडणी वसुली करत होते, आणि त्यांना पाठींबा देणारे काही राजकीय नेते हे परळी मधीलच आहेत. Manoj Jarange Patil on Walmik Karad
तसेच काही शेतकऱ्यांच्या आरोपांनुसार, वाल्मिक कराडने शेतकऱ्याना धमकावून त्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत. व या जमिनी पत्नीच्या नावाने आहेत. त्यामुळे वाल्मीक कराड आणि त्याची दहशत संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आहे हे स्पष्ट होत आहे. त्यासोबतच त्याने बेकायदा बेसुमार मालमत्ता हडप करून आपले आर्थिक साम्राज्य सुद्धा बळकट केले आहे. आणि हे आर्थिक साम्राज्य तो आपल्या गुन्हेगारीच्या बळावर निर्माण करत आहे आणि त्याला एका बड्या राजकीय नेत्याचा पाठिंबा आहे असेही बोलले जात आहे Walmik Karad News In Marathi
त्यासोबतच वाल्मीक कराड याची पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी आहे. पुण्यातील एका नामांकित कॉलेजच्या समोरच असलेल्या उंच इमारतीत त्यांने ऑफिसेस बुक केले आहेत. त्याची मालमत्ता सुमारे 25 कोटींच्या घरात आहे.
वाल्मीक कराड आणि बबन गीत्ते यांनी घेतली आहे एकमेकाला संपवण्याची शपथ?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मीक कराड हे नाव चर्चेत आहे तसेच यातील मुख्य आरोपी म्हणून त्यांचे नाव घेतले आहे.
त्यासोबतच सरपंच आंधळे प्रकरणात एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष बबन गीत्ते हा संशयित आरोपी आहे. पण गेल्या चार ते पाच महिन्यापासून तो फरार आहे अजूनही तो पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. पण सध्या बबन गीत्ते आणि वाल्मीक कराड यांच्यातील असलेला हा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. परळी मध्ये असेही बोलले जात आहे की, बबन गित्ते आणि वाल्मीक कराड यांनी एकमेकाला संपवण्याची शपथ घेतली आहे. Walmik Karad vs Baban Gitte
त्यामुळेच वाल्मीक कराड यांने जोपर्यंत बबन गित्ते ला संपवत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असे वचन घेतले आहे असे परळीतील नागरिक बोलत आहेत.
त्यासोबतच जोपर्यंत वाल्मीक कराडला संपवणार नाही तोपर्यंत दाढी-मिशा कट करणार नाही असा निश्चय बबन गित्ते याने केला आहे असेही परळी मध्ये बोलले जात आहे. कधीकाळी एकमेकांचे जिवलग दोस्त असणारे हे दोघे आता एकमेकांचे कट्टर दुश्मन झाले आहेत. अणि याचे म्हणजे राजकीय स्पर्धा. Walmik Karad Baban Gitte War
तर मित्रांनो, वरील लेखावर तुम्हाला काय वाटते, तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
हे हि वाचा :-
एकनाथ शिंदेंच्या मागे एवढी मोठी ताकद कोणाची? तब्बल 2 पालकमंत्री पदाच्या निर्णयाला मिळाली स्थगिती
कोलकत्ता डॉक्टर अत्याचार प्रकरणी फाशी का सुनावली नाही, जन्मठेप का दिली?