उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळणार गोलीगत धोका, हे मोठे नेते सोडतील पक्ष? | Uddhav Thackeray News

WhatsApp Group Join Now

Uddhav Thackeray News शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती अजून थांबेना. रोज पक्षातील नेते आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपली नवी राजकीय कार्यकिर्द चालू करत आहेत. त्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत.

अलीकडेच हिंदुहृदसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात मोठी गडबड पाहायला मिळाली. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांमध्ये एक माजी आमदारा गायब राहणं चर्चेचा विषय ठरला होता. अणि हा माजी आमदार म्हणजे राजन साळवी. ठाकरे गटाचे माजी आमदार असलेले राजन साळवी यांचा उद्धव ठाकरेंच्या गटाबद्दलचा असमाधानजनक दृष्टिकोन, त्यांच्या संभाव्य पक्ष बदलाच्या चर्चांना वाव देत आहे. Uddhav Thackeray News

राजन साळवी नाराज असल्याचे हे आहे कारण

राजन साळवी हे रत्नागिरीचे कणखर शिवसैनिक, जेव्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभूत झाला, तेव्हा त्यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर आरोप केला. राजन साळवी यांच्या पराभवाची कारणे त्यांनी उघड केली आणि स्पष्टपणे सांगितलं की, त्यांचं पराभव होण्यास आपल्याच पक्षातील काही नेत्यांचा हात आहे. त्यांच्या या विधानाने एक नवा वाद निर्माण होऊन ठाकरे गटातील अंतर्गत कुरघोडी बाहेर आली होती, कारण यामुळे साळवी यांच्या ठाकरे गटापासून अलिप्त होण्याची शक्यता चर्चेत आली. Uddhav Thackeray News

साळवी यांची नाराजी केवळ पराभवापर्यंतच सीमित नव्हती, तर त्यांचा पक्षातील नेतृत्त्वावर विश्वासही उडाल्याचं दिसत होतं. त्यांनी स्वतःच्या पराभवाचं कारण एका आपल्या गटातील नेत्यांना दिलं. विशेषतः विनायक राऊत यांच्यावर आरोप करत त्यांना आपल्या पराभवासाठी जबाबदार ठरवलं. Uddhav Thackeray News

राजन साळवी करणार शिवसेनेत प्रवेश?

Rajan Salavi Joining Shivsena राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या गटाशी असलेली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. त्याचवेळी, शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी कोकण क्षेत्रातील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची संभावना व्यक्त केली. रत्नागिरीमधून शिंदे गटात सामील होणाऱ्या नेत्यांमध्ये राजन साळवी यांचा समावेश असू शकतो, असा दावा अनेक राजकीय विश्लेषक करत आहेत.

WhatsApp Group Join Now
Rajan Salavi Joining BJP Shivsena

त्यानंतर, राजन साळवींनीही शिंदे गटात जाण्याबद्दल संकेत दिले, यामुळे त्यांची आगामी राजकीय वाटचाल वेगाने पुढे जाईल अशी चर्चा सुरू झाली.

राजन साळवींना त्यांच्या राजकीय भविष्यासाठी कोकणातून एक चांगली संधी मिळू शकते. उद्धव ठाकरे गटाचा प्रभाव कोकणात कमी झाला आहे आणि साळवी यांचा पराभव याच घटनेचं प्रतीक आहे. यामुळे ते शिंदे गटाच्या आधारे राजकीय परिस्थिती सुधारू शकतात. शिंदे गटात सामील होण्याने त्यांना, त्यांचे कार्यक्षेत्र आणि भविष्यातील राजकीय संभावनांचा एक नवा मार्ग दिसू शकतो. Rajan Salavi Joining Shivsena

तसेच, इडी (इन्कम टॅक्स डिपार्टमेंट) च्या चौकश्या आणि मालमत्तेच्या प्रकरणामुळे साळवींना खूप ताण आला होता. काही लोक असा विचार करत आहेत की, शिंदे गटात सामील होऊन त्यांना केंद्रात दिलासा मिळू शकेल. यामुळे शिंदे गटाच्या सहकार्याने साळवी आपल्या राजकीय प्रवासाला एक नवा गती देऊ शकतात. Uddhav Thackeray News

उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेची उत्सुकता

उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या धोरणानुसार राजन साळवींच्या अनुपस्थितीला गंभीरपणे घेतले गेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात राजन साळवी उपस्थित न होणे, हे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा मुख्य विषय बनले होते. साळवींना मेळाव्यासाठी निमंत्रण पाठवले गेले होते, परंतु त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

याबाबत एक नवा खुलासा उदय सामंत यांनी केला, ज्यात त्यांनी दावा केला की, उद्धव ठाकरेंच्या गटातील काही आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील होणार आहेत. याच संदर्भात राजन साळवींच्या अनुपस्थितीने हा दावा अधिक वजनदार बनवला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर आहे. ते यावर काय प्रतिक्रिया देतील याची उत्कंठा लागली आहे.

तसेच उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांशी असलेल्या त्यांच्या तणावपूर्ण संबंधांमुळे साळवी आणि त्यांची पक्षातील भविष्यातील भूमिका अंधारात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट? ऑपरेशन धनुष्यबाण आणि ऑपरेशन टायगर

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आणखी एक फूट पडणार का, या चर्चांना वेग आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडील दाव्यात म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्या गटाचे तीन खासदार शिंदे गटाशी संपर्क साधत आहेत, परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यांचा प्रवेश सध्या थांबलेला आहे. “ऑपरेशन धनुष्यबाण” आणि “ऑपरेशन टायगर” नावाचे दोन मोठे ऑपरेशन्स शिंदे गट राबवत आहे आणि याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होणार आहे. सामंत यांच्या दाव्यानुसार, यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाडा या क्षेत्रातील अनेक पदाधिकारी आणि आमदार शिंदे गटात सामील होणार आहेत. Operation Tiger In Maharashtra

या चर्चेचा आधार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या मेळाव्यामुळे आणखी मजबूत झाला. मेळाव्यात ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीने चर्चांना वाव दिला आहे. Operation Tiger In Maharashtra

उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात खासदार आणि आमदारांची अनुपस्थिती

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या मेळाव्यात अनेक खासदार आणि आमदार गैरहजर होते. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार बंडू जाधव, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मेळाव्याला हजेरी लावली नाही. यवतमाळचे खासदार संजय देशमुख चेन्नई दौऱ्यावर होते, परंतु अन्य अनेक खासदार आणि आमदारांनी गैरहजेरीला विविध कारणे सांगितली. Uddhav Thackeray News

Uddhav Thackeray News

विशेषत: माजी आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांची अनुपस्थिती चर्चेचा मुख्य विषय बनली. या अनुपस्थितीमुळे हेच सिध्द होते की ठाकरे गटात अंतर्गत मतभेद सुरू आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम आगामी राजकीय घडामोडींवर होईल का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. Uddhav Thackeray News

राजन साळवी आणि त्यांच्या राजकीय हालचाली

राजन साळवी हे ठाकरे गटाचे एक कणखर नेता मानले जात होते, आणि त्यांनी प्रत्येक कठीण परिस्थितीत ठाकरे गटाची साथ दिली होती. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. रत्नागिरीच्या राजापूर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले साळवी यांचा यावेळी शिंदे गटाच्या किरण सामंत यांच्याकडून पराभव झाला. यामुळे साळवी नाराज झाले आणि त्यांनी पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांवर आरोप केले. साळवी यांचा म्हणणं होतं की, आमदार विनायक राऊत यांनी आपल्या पराभवासाठी प्रयत्न केले. त्यांनी विरोधी पक्षातील किरण सामंत यांना विजयी करण्यासाठी अंतर्गत कुरघोड्या केल्या व माझा पराभव मुद्दाम घडवून आणला. Uddhav Thackeray News

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “योग्य वेळी योग्य निर्णय घेणार,” याचा अर्थ साळवी यांच्या ठाकरेंपासून अलिप्त होण्याची शक्यता उघड केली. यावरून असे दिसते की, राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

शिंदे गटात होणार विविध नेत्यांचे प्रवेश

रत्नागिरीतील माजी आमदार आणि अन्य पदाधिकारी यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची प्रक्रिया सुरू होईल. वैभव नाईक यांनी माजी आमदार राजन साळवी आणि त्यांना शिंदे गटाकडून लोकसभेच्या निवडणुकीनंतर पक्षात सामील होण्याची ऑफर मिळाल्याचं सांगितलं होत. Uddhav Thackeray News

जर या दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला कोकणमध्ये मोठा धक्का बसू शकतो, आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व अधिक मजबूत होईल.

ठाकरे गटातील फूट आणि आगामी राजकीय घडामोडी

उध्दव ठाकरे यांच्या गटात या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फूट पडणे निश्चितच चर्चेचा विषय बनले आहे. विशेषतः, मेळाव्याला अनेक प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती हे दर्शविते की, ठाकरे गटात अनिश्चितता आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते दावा करत आहेत की, ठाकरे गटातील चार खासदार आणि तीन आमदार त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. आणि जर हे खरं झालं तर निश्चितच महाराष्ट्रात पुन्हा एकदा भूकंप होईल.

तथापि राजन साळवी आणि वैभव नाईक यांची भूमिका नेमकी काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल. पण या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निश्चितच दबाव येणार हे निश्चित आहे. त्याचप्रमाणे, आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला साऱ्या परिस्थितीचा सामना करत मोठ्या ताकदीने निवडणुकीत उभे राहावे लागेल.

राजन साळवी भाजपमध्ये करणार प्रवेश?

Rajan Salavi Joining BJP मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार, कोकणातील एक मोठे नेते राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि उदय सामंत यांनी जोरदार प्रयत्न केले होते पण ते भाजपकडे जाणार असल्याची दाट शक्यता आहे.

उदय सामंत यांची वाढती ताकद एकनाथ शिंदेंना जड जाणार?

Uday Samant Next Deputy CM अलीकडेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला होता की, भाजप एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून एक नवा उदय पुढे आणेल. आणि हा उदय म्हणजेच उदय सामंत अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याचप्रमाणे संजय राऊत यांनीही दावा केला होता की येणाऱ्या काही दिवसांमध्ये उदय सामंत हे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री होतील. जेव्हा उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांच्यात याबाबत चर्चाही झाली होती असेही या नेत्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे खरंच उदय सामंत एकनाथ शिंदेंना धोका देतील का आणि शिवसेना पक्षाची धुरा आपल्याकडे सांभाळतील का? हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बघावे लागेल.

 

हे हि वाचा :-

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मिळाली जीवे मारण्याची धमकी दिली

सैफ अली खानची 15000 करोडची प्रॉपर्टी होणार जप्त?

WhatsApp Group Join Now

Leave a Comment