Maharashtra Kesari Kushti Fixing अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मोठ्या जोमाने चालली होती. पण अचानकपणे सेमी फायनल मॅच मध्ये एक मोठा गोंधळ झाला. पंचांनी चुकीचा निर्णय देऊन डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला बाहेर काढले. त्यामुळे राग अनावर न झाल्याने शिवराज ने मारली थेट पंचाला लाथ. नेमकं काय आहे प्रकरण वाचा सविस्तर बातमी.
यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीच्या मॅच्या अहिल्यानगर मध्ये दिमाखात पार पडत होत्या. पण स्पर्धेत झालेल्या वादामुळे या स्पर्धेचा निकाल आणि त्या संदर्भातील निर्णय आता चर्चेचा विषय बनले आहेत. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादग्रस्त घटनाक्रमाने स्पर्धेची प्रतिष्ठा आणि पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन प्रमुख पैलवान, शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर झालेल्या निलंबनामुळे हा वाद अजूनच गाजला आहे. Maharashtra Kesari Kushti Fixing
पंचांनी मुद्दाम दिला चुकीचा निर्णय?
भारतीय इतिहासात कुस्तीला खूप महत्त्व आहे, विशेषतः महाराष्ट्रात. महाराष्ट्र हा कुस्तीची पंढरी मानला जातो. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, तर जनतेने देखील कुस्तीला लोकाश्रय दिला. कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगलीसारख्या पट्ट्यांमध्ये कुस्तीला विशेष स्थान आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही एक अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते, आणि त्याचबरोबर यंदाची स्पर्धा आणखी चर्चेत आली आहे. यंदाच्या स्पर्धेत वादाच्या घटनांनी या परंपरेला धक्का पोहोचवला आहे. Maharashtra Kesari Kushti Fixing
Maharashtra Kesari Kushti Wrong Decision यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपांत्यपूर्व मॅच शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. या लढतीत पृथ्वीराज मोहळ यांनी शिवराज राक्षेचा पराभव केला. पंचांनी चुकीचा निर्णय दिला होता असा आरोप करण्यात आला. शिवराज राक्षे यांनी यावर आक्षेप नोंदवला आणि रिप्लाय मध्ये तो डाव पुन्हा पाहण्याची विनंती केली, पण तरीही पंचांनी न पाहता मोहोळ यांना विजयी घोषित केले आणि त्यानंतर मैदानात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. शिवराज राक्षे आणि त्यांचे समर्थक या निर्णयावर संतप्त झाले आणि शिवराज राक्षे यांनी पंचाची कॉलर धरली आणि पंचांना लाथ मारली. Maharashtra Kesari Kushti Fixing

महाराष्ट्र केसरी मॅच फिक्सिंग, यांनी केला आरोप Maharashtra Kesari Kushti Fixing
शिवराज यांचे वस्ताद यांनी झालेल्या घटनेवर आपले मत व्यक्त करत कुस्ती परिषदेवर आरोप केला आहे की, महाराष्ट्र केसरी होणार हे आधीच ठरलेलं असतं. त्यामुळे कुठेतरी फिक्सिंगचा प्रकार घडत असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.
त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या मॅच वर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी पंचांना चुकीचे ठरवत पंचांनी मुद्दामून शिवराज ला स्पर्धेबाहेर काढून एक प्रकारे फिक्सिंग केली असा आरोप केला आहे. Maharashtra Kesari Kushti Fixing
थेट अजित पवारांसमोरच मारली लाथ, शिवराज वर तीन वर्षे निलंबनाची कारवाई
रागाच्या भरात डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज ने पंचाला लाथ मारली हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावेळी स्टेजवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. त्यासोबतच भाजपा खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासमोरच थेट पंचांना लाथ मारल्यामुळे कुस्ती परिषदेने शिवराज वर मोठी कारवाई केली. कारवाईत त्यांनी शिवराज राक्षेवर तीन वर्षाची बंदी घातली आहे. या तीन वर्षाच्या बंदीमुळे शिवराज राक्षेला पुढील तीन वर्ष कोणत्याही कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. त्यामुळे ही निलंबनाची कारवाई शिवराज राक्षे साठी खूपच धक्कादायक मानली जात आहे. Shivraj Rakshe Fiting with Umpire
पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत – चंद्रहार पाटील
डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी सुद्धा झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व त्यांनी पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे विधान केले आहे. त्यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. तसेच त्यांनी हे देखील म्हटले आहे की माझ्या बाबतीत सुद्धा असा प्रकार घडला होता व मला तीन वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान रोखला गेला होता. तसेच त्यांनी आपल्या महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्ती परिषदेला परत करणार आहे असे जाहीर केले आहे. Chandrahar Patil Supported to Shivraj Rakshe
एक कोटीचे बक्षीस केले जाहीर
कुस्तीतील एक मातब्बर वस्ताद यांनी झालेल्या संपूर्ण प्रकारावर आपले मत व्यक्त करत म्हटले आहे की पंचांनी चुकीचा निर्णय देऊन शिवराज राक्षेवर अन्याय केला आहे. तसेच जो कोणी पंचांचा हा निर्णय योग्य होता हे सिद्ध करेल त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल असेही त्यांनी जाहीर केले आहे. कारण त्यांनी म्हटले आहे की कुस्ती क्षेत्रातला कोणीही व्यक्ती सांगू शकतो की येथे पंतांनी चुकीचा निर्णय दिला आहे. व शिवराजला महाराष्ट्र केसरी होण्यापासून जाणून-बुजून रोखण्यात आले आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी गेम केली?
Muralidhar Mohol Fixing Maharashtra Kesari Kushti भाजपचे नवनिर्वाचित खासदार आणि मंत्री महोदय यांनीच कुस्ती स्पर्धेत गेम केली असेही सोशल मीडियावर बोलले जात आहे. मुळात मुरलीधर मोहोळ हेदेखील पैलवान आहेत, तसेच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि मुरलीधर मोहोळ हे दोघेही एकाच गावात राहतात. मुरलीधर मोहोळ यांनीही कोल्हापुरातून कुस्तीचे धडे घेतले होते. अणि आता केंद्रीय मंत्री झाल्यावर मुरलीधर मोहोळ यांनी आपली राजकीय ताकद वापरून अदृश्य हाताने पृथ्वीराज मोहोळ यांना सपोर्ट करून त्यांना महाराष्ट्र केसरी केले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या स्पर्धमध्ये राजकीय गुंतागुंतीचा संशय वाढून स्पर्धेला गालबोट लागत आहे. Maharashtra Kesari Kushti Fixing
महेंद्र गायकवाड यांच्यावर सुद्धा तीन वर्षाची कारवाई
शिवराज राक्षेचा वाद मिटत नाही तोवर आणखीन एक वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्र केसरीच्या फायनल मॅच मध्ये पृथ्वीराज मोहोळ यांच्या विरुद्ध महेंद्र गायकवाड हा पैलवान उभा होता. पण या मॅच मध्ये सुद्धा पंचांनी चुकीचा निर्णय देऊन पृथ्वीराज मोहोळ याला अतिरिक्त गुण दिले होते. त्यावेळी महेंद्र गायकवाड यांनी यावर आक्षेप नोंदवला पण त्यालाही पंचांनी दाद दिली नाही. त्यामुळे रागाच्या भरात पैलवान महेंद्र गायकवाड यांनी मैदान सोडले त्यामुळे अर्थातच पृथ्वीराज मोहोळ यांना महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित केले. पण मैदान सोडून गेल्यामुळे महेंद्र गायकवाड यांच्यावर कुस्ती परिषदेने तीन वर्ष निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे महेंद्रही पुढील तीन वर्षे कोणतीही कुस्ती खेळू शकणार नाही. Mahendra Gaykawad banned for 3 year
पण आता शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्या निलंबनावर अनेक मतमतांतरे आहेत. याव्यतिरिक्त, या प्रकरणात राजकारणाची गुंतागुंत देखील दिसून येत आहे. राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी यावर बोलताना पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, प्रत्येक मल्ल प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करतो, पण एखाद्या मल्लाला पंचांना लाथ मारण्याची वेळ का येते, यावर विचार केला पाहिजे. Shivraj Rakshe banned for 3 year
शिवराज राक्षे यांचे प्रशिक्षक काका पवार यांनी देखील या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हंटले की, पंचांच्या निर्णयाच्या विरोधात जे काही घडले, ते चुकीचे होते. ते म्हणाले की, शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्या निलंबनाचा निर्णय चुकीचा आहे. तसेच, त्यांनी कुस्तीगीर परिषदेला ही बेकायदेशीर ठरवले आहे. Shivraj Rakshe Coach Kaka Pawar
शिवराज राक्षे यांच्या कुटुंबीयांनी देखील या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवराजच्या आईने प्रसार माध्यमांसमोर येऊन सांगितले की, पंचांनी निर्णय देण्याआधी रिप्लाय दाखवायला हवं होतं. त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने जोरदार संघर्ष सुरू केला आहे. शिवराज आणि महेंद्र यांच्यावर झालेले निलंबन हे अन्यायकारक आहे, असंही त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शिवराजच्या आईने पंचांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे, कारण तेही चुकले होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादग्रस्त घटनांमुळे स्पर्धेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेने निलंबित केलेल्या खेळाडूंवर आणि पंचांच्या निर्णयावर अनेक लोकांकडून विरोध आणि समर्थन व्यक्त करण्यात आलं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, कुस्तीमध्ये केवळ शारीरिक सामर्थ्याचं महत्व नाही, तर खेळाडूंच्या मानसिकतेचेही महत्त्व आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर, पुढे कुस्ती परिषदेनेही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यकाळात असे प्रकार घडू नयेत. Maharashtra Kesari Kushti Fixing
हे हि वाचा :-
भाजप एकनाथ शिंदेंना सोडून ठाकरेंना जवळ करणार?
उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळणार गोलीगत धोका, हे मोठे नेते सोडतील पक्ष?