Ladka Bhau Yojana विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकार रोज नवनव्या योजना आणत आहे. काही दिवसापूर्वी राज्य सरकारने महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गाला एक आकर्षक योजना आणली होती मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळणार आहेत
जेव्हा माझी लाडकी बहीण योजना चालू झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या काही तरुणांनी गंमतशीरपणे म्हणलं की आता लाडका भाऊ योजना Ladka Bhau Yojana चालू करा आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही पण मागणी मान्य केली आहे. पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्ताने ही योजना जाहीर केली आहे. मुळात या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. यातून महाराष्ट्रातील तमाम बेरोजगार युवकांना, तरुणांना मानधन दिले जाणार आहे.
काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना / लाडका भाऊ योजना
Ladka Bhau Yojana या योजनेद्वारे बेरोजगारांना काम दिले जाईल व त्याबद्दल त्यांना सरकारतर्फे मानधन दिले जाईल.
12 वी उत्तीर्ण झालेल्या तरुणाला प्रति महिना 6000 रुपये मिळणार आहे.
डिप्लोमा पॉलिटेक्निक उत्तीर्ण असलेल्या तरुणाला प्रति महिना 8000 रुपये इतके मानधन मिळणार आहे.
आणि पदवीधर असलेल्या युवकाला प्रति महिना 10,000 रुपये इतके मानधन मिळणार आहे.
यासाठी उत्तीर्ण तरुणाला हे काम करावे लागेल
या योजनेतून तरुणाला मोफत काहीही मिळणार नाही. त्यासाठी युवकांना एखाद्या कंपनीत, कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करावी लागेल. त्याबद्दल दिले जाणारे मानधन हे सरकारकडून तरुणांना मिळेल.
कंपनीत किंवा कारखान्यात अप्रेन्टिसशिप केल्याने बेरोजगार तरुणांना कामाचा अनुभव येईल आणि मग त्या च्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर त्याला जॉब दिला जाईल.
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्याचा हा आहे उद्देश
शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षण झालेले असूनही आवश्यक असलेली कौशल्ये, नॉलेज नसल्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही तसेच त्यांच्यासाठी नोकरीच्या संध्या खूप कमी आहेत. त्यामुळे बेरोजगारपणा खूप वाढलेला आहे. आणि तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे ती अस्वस्थता दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही योजना चालू केली आहे. या योजनेमुळे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल त्याबद्दल त्यांना काही मानधन ही मिळणार आहे.
तसेच त्यांना अप्रेन्टिसशिप मध्ये केलेल्या कामाच्या बळावर त्याच कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी सुद्धा मिळेल किंवा ते बाकीच्या कंपन्या किंवा त्यांच्या मनपसंद असणाऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा नोकरीसाठी अप्लाय करू शकतात आणि ते स्वतःच्या पायावर उभा राहतील यासाठी योजना आणलेली आहे.
Ladka Bhau Yojana या योजनेसाठी जे तरुण इच्छुक आहेत अशा तरुणांना राज्य सरकार तर्फे महामंडळांमध्ये किंवा उद्योगांमध्ये किंवा आस्थापना मध्ये कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच 6 महिन्यांचा हा कालावधी असेल. या कालावधी मध्ये बेरोजगार युवकांना सहा हजार रुपये पासून ते दहा हजार रुपये पर्यंत प्रति महिना मानधन मिळेल.
हेही वाचा : विशाळगडावर अतिक्रमण, दगडफेक-हल्ला.
लाडका भाऊ योजनेसाठी 5500 कोटींचा निधी
Mukhyamantri Yuva Kary Prashikshan Ladka Bhau Yojna महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी तब्बल 5500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून पात्र उमेदवाराला प्रति महिना पात्र निकषानुसार मानधन दिले जाणार आहे. आणि हे मानधन फक्त याच वर्षी नव्हे तर कायमस्वरूपी वर्षानुवर्षे दिले जाणार आहे अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर मध्ये झालेल्या सभेत दिले आहे
अर्ज दाखल करण्यासाठी काही नियम व अटी
राज्य सरकारने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि उद्योग यांच्यासाठी काही निकष लावले आहेत
उमेदवाराचे निकष खालीलप्रमाणे-
- उमेदवाराचे वय कमीत कमी 18 असावे पण 35 वर्षापेक्षा जास्त वय नसावे.
- उमेदवार किमान बारावी पास असला पाहिजे तसेच आयटीआय, डिप्लोमा, पदव्युत्तर यापैकी कोणतेही शिक्षण पूर्ण असले पाहिजे.
- उमेदवार हा महाराष्ट्रीयन असला पाहिजे म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
- अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड असले पाहिजे.
- इच्छुक उमेदवाराचे आधार कार्ड त्याच्या बँक खात्याशी लिंक केलं असल पाहिजे.
यांना मिळणार नाही या योजनेचा लाभ
- अर्ज दाखल करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी नसल्यास त्याला या योजनेला अर्ज करता येणार नाही.
- ज्या तरुणांचे शिक्षण सध्या चालू आहे किंवा जे उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जे सध्या कामावर रुजू आहेत व ज्यांना दहा हजार पेक्षा जास्त पगार मिळत आहे त्यांनी या योजनेचा लाभ न घेतलेलाच बरा कारण या योजनेतून किमान 6000 आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये मिळणार आहेत
उद्योग किंवा आस्थापना यांच्यासाठी या आहेत नियम व अटी
- या योजनेत सहभागी होणारा उद्योग हा महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असला पाहिजे.
- उद्योग हा किमान तीन वर्षे जुना असला पाहिजे. नवीन उद्योग व तीन वर्ष जुन्या नसलेल्या उद्योगांना यामध्ये भाग घेतला नाही
- इच्छुक असलेल्या आस्थापना/उद्योगांनी GST, ESIC, Employees Provident Fund (EPF), Certificate Of Incorporation, DPIT व उद्योग आधार मध्ये नोंदणी केलेली असली पाहिजे.
येथे करा नोंदणी
नोंदणी करण्याची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. यामध्ये ज्यांना रोजगार हवा आहे ते बेरोजगार उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करतील
त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आपला ऑनलाईन अर्ज सबमिट करा
https://rojgar.mahaswayam.gov.in/
या योजनेवर शरद पवारांनी केली जळजळीत टीका
राज्यातील तरुण व तरुणींनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. त्यामुळेच हे सरकार नव नवीन योजना आणत आहे. आधी तरुणींसाठी योजना आणली, आणि आता तरुणांसाठी योजना आणली आहे. महायुतीला आत्ताच बहीण भावाची आठवण का झाली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच लोकसभेच्या निकाला मध्ये मिळालेल्या मतांमुळेच त्यांना ही योजना सुचली असा टोलाही लगावला.
अशाच नवनवीन बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group मध्ये जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FXyboR88flZ1YqMxQa381W