Imtiaz Jaleel Statement On Vishalgad Violence
विशाळगड अतिक्रमण, हल्ला, दगडफेक या घटनेमुळे महाराष्ट्राचे वातावरण खूपच तापलेल आहे. रोज हे प्रकरण नवीन वळन घेत आहे. विशाळगड गजापूर मुसलमानवाडी वस्त्यांवर अजूनही तणाव आहे, त्यासोबतच भयानक शांतता ही आहे. दोन्ही गटाकडून रोज दावे प्रति-दावे होत आहेत.
पण काल छत्रपती संभाजी नगर मध्ये एम.आय.एम. चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले त्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. Imtiaz Jaleel Statement On Vishalgad Violence
काय म्हणाले इम्तियाज जलील
Imtiaz Jaleel Statement On Vishalgad Violence विशाळगडावर घडलेल्या हिंसाचार प्रकरणी कोल्हापुरात मुस्लिम संघटनाने विरोध केला होता. तसेच MIM ने 19 जुलैला कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. तेव्हापासून कोल्हापुरात नवा वाद निर्माण झाला होता. पण नंतर आम्ही मोर्चा रद्द करत आहोत असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे प्रशासनाने, पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पण काल अचानक छत्रपती संभाजी नगर मध्ये बोलताना त्यांनी खूप जहरी टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. खुलेआम मशिदीची तोडफोड करण्यात येत आहे. ज्या मशिदी अतिक्रमण भागात नाहीत त्या मशिदीची हि तोडफोड होत आहे.
आज एक मशिद पाडली उद्या आणखीन एक मशीन पाडाल
एक वेळ मी माझ्या घरावर हल्ला सहन केला असता पण मशिदी वर हल्ला कधीच सहन करणार नाही. विधानसभा निवडणूक जवळ आली म्हणून तुम्हाला दर्गा आठवत आहे का असेही आपल्या भाषणामध्ये जलील म्हणाले.
कोल्हापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना यांना मी तिथे नको आहे. कोल्हापूर ही तुमच्या बापाची जहागीर नाही असे धक्कादायक वक्तव्य यांनी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात वातावरण खूप तापले आहे. यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सभेत बोलत असताना ते म्हणाले की आता तुम्ही अतिक्रमणच्या नावाखाली एक मशिद पाडलेली आहे, उद्या अतिक्रमणाच्या नावाने आणखी दुसरी मशिद पाडाल. आणि हे सत्र तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवाल. तसेच काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षातील किती नॉन मुस्लिम लोक याबद्दल निवेदन देत आहेत. असा प्रश्नही राजकीय पक्षांना उपस्थित केला.
हेही वाचा : विशाळगडावर अतिक्रमण, दगडफेक-हल्ला. वाचा संपूर्ण प्रकरण
पोलीस प्रशासनावर केले गंभीर आरोप
पोलीस प्रशासनाने त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही. जर त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती तर अशी घटना घडली नसती. तसेच पोलिसांवर कसले दडपण होते असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
तेव्हा कोण मर्द समोर आला नव्हता
मध्यंतरी छत्रपती संभाजी नगर मधील किराडपूर परिसरात श्रीराम मंदिरावर काही लोक हल्ला करणार होते ही बातमी जेव्हा मला समजली, तेव्हा मी एकटा पुढे आलो होतो. आणि ही परिस्थिती हाताळली होती. आणि तेव्हा शांतता प्रस्तावित केली होती. त्यावेळी कोणता मर्द पुढे आला नव्हता. पण त्या ठिकाणी हा इम्तियाज जलील एकटाच पुढे आला होता असेही ते म्हणाले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुस्तक पाठवतो ते एकदा वाचा
माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी “चलो विशाळगड” नारा दिला आणि त्यानंतर विशाळगड परिसरात खूपच हिंसक घटना घडली. संभाजीराजे छत्रपतींनी या मोर्चाचं नेतृत्व करायला नको होतं. संभाजी राजे तोडफोड करतात आणि त्यांचे वडील शांतता राखा, संयम ठेवा असे सांगतात.
मी तुम्हाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आजच पुस्तक पाठवतो आणि तुम्हाला हात जोडून सांगतो ते पुस्तक तुम्ही नीट वाचा. तुम्ही स्वतःला राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणवून घेता त्या संभाजीराजे छत्रपतींना माझा एक प्रश्न आहे की, आपण लोकराजा शाहू महाराजांचे वंशज असूनही जाळपोळीचे नेतृत्व का केलं?
कुठे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कुठे महाराष्ट्राचे वातावरण बिघडणारे तुम्ही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : रील काढण्याच्या नादात 300 फूट दरीत पडून तरुणीचा मृत्यू
काय घडलं होतं नेमकं प्रकरण
विशाळगडावर आणि पायथ्याशी जवळपास १६० च्या वर अतिक्रमणे आहेत. यावर लोकांनी घरे, हॉटेल्स, आपली व्यवसाये बसवली आहेत. पण कित्येक वर्षापासून या अतिक्रमणाला विरोध होत होता.
हे अतिक्रमण काढण्यासाठी सरकारने अंदाजे 1.60 कोटी रुपयांचा निधी सुद्धा दिला होता. पण तरीही हा अति संवेदनशील भाग असल्यामुळे याच्यावर कारवाई होत नव्हती. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचा प्रश्न रेंगाळत पडला होता.
पण 14 जुलै रोजी मा. राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी “चलो विशाळगड” नारा दिला. तेव्हा राज्यातील हजारो शिवभक्तांनी, कार्यकर्त्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला. आणि अचानक तोडफोड, जाळपोळ अशा घटना घडल्या. त्यावेळी त्या भागातील अतिक्रमण धारकांच्या घरांवर, दुकानावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.
नंतर प्रशासनाने यावर कारवाई करून अतिक्रमण जमीनदोस्त करणार असल्याचे जाहीर केले तेव्हा आंदोलन शांत झाले व ते माघारी परतले. पण तेव्हापासून राज्याचे वातावरण तापले होते.
सरकारने यामध्ये जवळपास 500 लोकांवर गुन्हे नोंदवली आहेत. व त्यातील कित्येक जणांना अटक सुद्धा केलेली आहे. तसेच या मोर्चाला कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी नकार दिला होता व त्यांनी आम्ही सहभागी होणार नाही असे जाहीर करून टाकले होते. या त्यांच्या निर्णयाचे कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाजाने स्वागत सुद्धा केले होते.
राजकीय नेत्यांनी दिली भेट
हिंसाचाराची घटना घडल्यानंतर विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी विशाळगडच्या पायथ्याशी आणि परिसराला भेट दिली होती. त्यात प्रामुख्याने कोल्हापूरचे नूतन खासदार शाहूराजे छत्रपती, बंटी पाटील यांच्यासह अजित पवार हे सुद्धा विशाळगडच्या पायथ्याशी आले होते. त्यांनी परिस्थिती पूर्ण समजून घेतली व पंचनामा झालेल्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली. तेव्हा तेथील नागरिकांनी नेत्यांची भेट घेत म्हंटले की अशा प्रकारची कृपया करून कारवाई करू नका.