Hit And Run Cases in Maharashtra | भरधाव ऑडी कारनं रिक्षाला ठोकलं, 7 वेगवेगळ्या घटनेत सात जणांनी गमावला जीव

WhatsApp Group Join Now

Hit And Run Cases in Maharashtra
राज्यात आणि देशभरात Hit And Run च्या केसेस थांबण्याच नावच घेईनात. रोज नवनवीन Hit And Run ची प्रकरणे समोर येत आहेत. जणू काही Hit And Run ची मालिका सुरू आहे असेच वाटत आहे.

पुणे आणि मुंबई या दोन मोठ्या सिटी मध्ये प्रामुख्याने अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. कालच पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात Hit And Run ची आणखीन एक नवी घटना समोर आली आहे.

Hit And Run Cases in Maharashtra या घटनेमध्ये एका अति वेगवान कार ने थेट महिलेला धडक दिली होती. ही धडक एवढी भीषण होती की महिला 50 फुटापर्यंत फरफटत गेली. या घटनेत त्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्या दुखापदग्रस्त महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

त्यानंतर त्या कार ने रस्त्यावर उभ्या असलेल्या आणखीन काही रिक्षांना आणि मोटरसायकलींना धडक दिली. त्यामध्ये रिक्षा आणि मोटरसायकल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ऑडी चालकाने 2 रिक्षांना ठोकलं

Hit And Run Cases in Maharashtra
ठाणे मुंबई मधल्या मुलुंड मध्ये ही अशाच प्रकारची एक मोठी दुर्घटना घडली. यामध्ये ऑडी चालकाने दोन रिक्षांना जोराची धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा ड्रायव्हर त्यासोबत रिक्षातील प्रवासी खूप लांब वर फेकले गेले.

Audi Hit and Run case in Mulund Mumbai
यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. यात एका रिक्षा चालकाची परिस्थिती गंभीर आहे. तर अपघात ग्रस्त प्रवाशांना आणि चालकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात रिक्षाचा पार चुराडा झाला आहे.

अपघातानंतर पसार झाला ऑडी चालक

Hit And Run Cases in Maharashtra बेदरकारपणे गाडी चालवून ऑडी मालकाने दोन रिक्षांना धडक दिल्यानंतर अपघात ग्रस्त लोकांना मदतीची अपेक्षा होती. ते मदतीसाठी विव्हळत होते. पण त्यावेळी त्यांना मदत न करता ऑडी चालक लोक मारहाण करतील या भावनेतून पसार झाला. यामुळे लोकांना घटनेचे गांभीर्यच नाही असे दिसून येते. Hit And Run Cases in Maharashtra

हेही वाचा : आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात हिंसाचार, अंधाधुंद गोळीबार 100 ठार

अमीर बापाची माजलेली पोरं

सध्या ज्या काही Hit And Run ची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये मोठे बिल्डर, मोठे बिझनेस मॅन यांचीच मुले गाडी चालवताना दिसत आहेत. व ते व्यसनाच्या आहारी जाऊन वेगात गाडी चालवत दुसऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत.

अशा माजलेल्या पोरांना त्यांच्या बापाचा धाक नाहीच. पण त्यासोबत त्यांना प्रशासनाचा, पोलिसांचा ही धाक नसल्यासारखे ते वागत आहेत. त्यामुळे रोज नवीन नवीन अपघाताची प्रकरणे समोर येत आहेत. रस्त्यावरून बाहेर जावं की न जावं हा प्रश्न लोकांच्या समोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मुलानेही केला होता अपघात

Mihir Shah Hit And Run Cases in Mumbai
मध्यंतरी मुंबई परिसरात सत्तेत असलेल्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलाने सुद्धा बेदरकारपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशाला ठोकले होते त्यात त्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला होता. तर अन्य एक जण गंभीर झाला होता. जेव्हा अपघात झाला त्यावेळी त्या राजकीय बापाचा पोरगा गाडी टाकून पसार झाला होता. तेव्हा त्याच्या गाडीवर एका राजकीय पक्षाचे चिन्ह होते नंतर त्याच्या बापाने हे चिन्ह मिटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

WhatsApp Group Join Now
Mihir shah & Agrawal Porshe car Hit And Run Cases in Pune Mumbai

आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला पक्षातूनच काढून टाकले

Mihir Shah Hit and Run case in Mumbai
राजकीय पक्षाच्या नेत्याच्या पोराने मोठा अपघात केला व त्यात एक जीवितहानी घडली ही बाब मीडियाने उचलून धरली. तसेच विरोधकांनी सुद्धा उचलून धरले व त्या राजकीय पक्षाची कोंडी करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून त्याला पक्षातूनच काढून टाकले. त्यामुळे असे म्हणावे लागेल की पोरामुळे बापाचे राजकीय अस्तित्व संपले.

महाराष्ट्रात या ठिकाणी घडलीत हिट अँड रन ची प्रकरणे

अपघात नंबर 1
सर्वात पहिला घडला पुण्यातील कल्याण नगर मध्ये.
19 मे ला अग्रवाल बिल्डरच्या पोराने पोर्शे ही आलिशान गाडी वेगाने चालवत दारूच्या नशेत हा अपघात केला.
या अपघातामध्ये युवक आणि युवती हे दोघे जागीच ठार झाले होते. Porsche Car hit and run case in pune

अपघात नंबर 2
मुंबईच्या वरळी भागात 7 जुलैला BMW कार ने महिलेला चिरडल होत. अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती.
BMW hit and run case in pune

अपघात नंबर 3
8 जुलैला गस्तीवर असलेल्या पोलिसांवरच कार चालवली यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला होता.

अपघात नंबर 4
नाशिक त्रंबकेश्वर रोडवर एका तरुणाला भरधाव कारने ठोकले होते.

अपघात नंबर 5
नाशिकमध्येच वेगवान गाडी अंगावर गेल्याने महिलेचा मृत्यू झाला होता

अपघात नंबर 6
नागपूर मध्ये हा अपघात झाला. या अपघातात 6 वर्षीय चिमुरडी जागीच ठार झाली होती.

अपघात नंबर 7
पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाने कार गाडी घालून टेम्पो चालक आणि क्लिनर यांना गंभीर जखमी केले होते.

ही आहेत अपघात होण्याची कारणे
  • कमी वयात दारूचे व्यसन.
  • अल्पवयीन पोरांना बियर बार मध्ये मिळणारी दारू.
  • आणि त्या दारूच्या नशेत वेगवान गाडी चालवणे.
  • बापाच्या पैशाचा माज.
  • कायदा आपल काहीच करणार नाही. आपण पैशाचे व्यवहार करून सगळे मॅनेज करू शकतो ही खोटी भावना

एकंदरीत या सगळ्या अपघातावरून असे दिसते, की जगणे झाले महाग आणि मरणे झाले स्वस्त.

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिले होते आव्हान

Aditya Thackray On Eknath Shinde Mihir Shah Hit and Run
मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचा एक मोठा नेता राजेश शहा याचा माजलेला पोरगा मिहिर शहा याने बेदरकारपणे गाडी चालवून एका महिलेचा जीव घेतला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी राजेश शहा याला शिवसेनेच्या पदावरून काढले होते.

हेही वाचा : शरद पवार देशातील सर्वात भ्रष्ट राजकारणी अमित शहा यांची टीका

फक्त पदावरून काढून चालणार नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्या नेत्याच्या घरावर बुलडोजर फिरवायला पाहिजे असे थेट आव्हानच ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले होते.

तुम्ही बिअर बारवर बुलडोजर चालवता, तोडफोड करता, त्यांना जन्माची अद्दल घडवता त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या नेत्यांवर कारवाई करणार का? त्यांची घरे बुलडोजरने तोडणार का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment