महाराष्ट्र शासनाची नवी योजना – ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतभर मोफत तीर्थ यात्रा | Free Teerth Darshan Yojana

WhatsApp Group Join Now

Free Teerth Darshan Yojana
राज्य सरकार महाराष्ट्रातील नागरिकांसाठी रोज नव नव्या योजना आणत आहे.
मध्यंतरी बहिणीसाठी लाडकी बहीण योजना आणली. या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेच्या मार्फत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
त्यानंतर तरुणांसाठी लाडका भाऊ योजना आणली त्यातही तरुणांना रुपये 6000 ते 10000 हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. आता सरकारने आणखी एक योजना आणली आहे.

खरंतर माणूस जेव्हा आपल्या वयाची साठ वर्षे ओलांडतो. तेव्हा त्याला तीर्थ यात्रा, मंदिर मठा मध्ये जाऊन आपल्या भगवंताचे दर्शन घेण्याची आस लागलेली असते. पण या वाढत्या महागाईमुळे आणि वाढलेल्या तिकिटामुळे ते शक्य होत नाही व ती शेवटची इच्छा अधुरीच राहते.

पण आत्ता त्यांची ही इच्छा महाराष्ट्र सरकार पूर्ण करणार आहे. महाराष्ट्र सरकार का वयोवृद्ध नागरिकांसाठी एक योजना आणत आहे. या योजनेचे नाव आहे मोफत तीर्थ यात्रा.

मोफत तीर्थयात्रा ही योजना काय आहे?

Free Teerth Darshan Yojana मोफत तीर्थ यात्रा ही योजना खास वृद्ध नागरिकांसाठी आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील तमाम नागरिक महाराष्ट्रासह, भारतातील प्रमुख मंदिरे आणि तीर्थ यात्रा यांचा प्रवास मोफत करणार आहेत. या तीर्थक्षेत्राला जाण्याचा आणि येण्याचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र सरकार करणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे कामही चालू आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील तमाम जनता फ्री मध्ये तीर्थ यात्रा अगदी सहजपणे करू शकणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.

हेही वाचा : लाडका भाऊ योजना – सरकार देत आहे तरुणांना 10,000 रुपये महिना

या धार्मिक स्थळांना तुम्ही मोफत जाऊ शकता

या योजनेच्या अंतर्गत देशातील जवळपास 73 धार्मिक ठिकाणांना तुम्ही जाऊ शकता.
Mukhyamantri Free Teerth Darshan Yojana 2024

त्यातील प्रमुख धार्मिक स्थळे खालील प्रमाणे :-

  • केदारनाथ
  • अमरनाथ मंदिर
  • सोमनाथ मंदिर
  • अयोध्या श्रीराम मंदिर
  • वैष्णोदेवी मंदिर
  • शबरीमाला मंदिर
  • वाराणसी मंदिर
  • मीनाक्षी मंदिर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे

तर महाराष्ट्रातील जवळपास 66 धार्मिक ठिकाणी तुम्ही जाऊ शकता.
त्यातील प्रमुख धार्मिक स्थळे खालील प्रमाणे :-

  • सिद्धिविनायक
  • अष्टविनायक
  • ज्योतिर्लिंग
  • कोल्हापूरची अंबाबाई
  • तुळजापूर
  • ज्योतिबा
  • माहूर या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

तसेच मुस्लिम धर्मियांसाठी सुद्धा एक तीर्थस्थळ सरकारने या योजनेमध्ये समाविष्ट केले आहे. Mukhyamantri Free Teerth Darshan Yojana 2024

WhatsApp Group Join Now
mukhyamantri Free Teerth Darshan Yojana 2024

मोफत तीर्थ यात्रा योजनेसाठी काही नियम व अटी :-

  • अर्ज करणारा नागरिक हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
  • त्याचे आधार कार्ड नुसार वय 60 वर्षे किंवा त्याच्या पुढील असले पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
  • आजी-माजी आमदार, खासदार असलेल्या कुटुंबातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
  • शासकीय नोकरी असलेल्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्ज करणारा नागरिक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे. व तो कोणत्याही दुर्गम आजाराने त्रस्त असता कामा नये.

मोफत तीर्थ यात्रा योजनेसाठी असा करा अर्ज :-

  • नागरिक ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे आपला अर्ज सादर करू शकतात.
    ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी एक संकेत स्थळ असणार आहे त्याच्यावर जाऊन त्याला आपली पूर्ण माहिती भरून अर्ज सादर करावे लागेल.
    आणि ज्याला ऑनलाईन अर्ज भरणे शक्य नाही ते लोक सेतू सुविधा केंद्राद्वारे आपला अर्ज भरू शकतात.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. यामध्ये कोणतीही फी नाही.
  • अर्ज भरताना ज्याच्या नावे अर्ज भरायचा आहे ती व्यक्ती स्वतः हजर असली पाहिजे. कारण अर्ज करणारे व्यक्तीचा फोटो काढला जाणार आहे आणि त्याची केवायसी करण्यात येईल.

तीर्थ यात्रा योजनेसाठी ही आहेत आवश्यक कागदपत्रे :-

Free Teerth Darshan Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ही जर कागदपत्रे तुमच्या जवळ नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

  1. रेशन कार्ड
  2. स्वतःचे आधार कार्ड
  3. महाराष्ट्रात राहत असलेला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला
  4. कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलेचा उत्पन्न दाखला किंवा केसरी अथवा पिवळे रेशन कार्ड
  5. तुम्ही तंदुरुस्त आहात त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
  6. पासपोर्ट आकाराचे 3 आयडेंटी फोटो
  7. आपल्या जवळच्या एखाद्या नातेवाईकाचा संपर्क क्रमांक.

मुस्लिम समाजाच्या नेत्यांकडून या योजनेवर घेतला जात आहे आक्षेप

भिवंडी पूर्वचे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी या योजनेवर सडकून टीका केली आहे. रईस शेख म्हणाले की प्रताप सरनाईक यांनी जेव्हा या योजनेचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांनी सांगितले होते की या योजनेचा सर्व धर्मियांना लाभ होईल म्हणजे हिंदू, शीख, जैन ईसाई या सर्व धर्मातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. पण त्यांनी मुद्दाम मुस्लिम धर्माचा उल्लेख केला नाही.
Mukhyamantri Free Teerth Darshan Yojana 2024

यामध्ये त्यांनी भेदभाव केला असल्याचे दिसत आहे. तसेच याबाबतीत जेव्हा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी अत्यंत हुशारीने मुस्लिमांसाठी अजमेर दर्गा हे स्थळ या योजनेमध्ये समाविष्ट असल्याने सांगितले. Free Teerth Darshan Yojana

तसेच MIM चे अध्यक्ष खासदार अझरुद्दीन ओवेसी यांनीही आपल्या ऑफिशियल ट्विटरच्या माध्यमातून या योजनेवर टीका केली.
ते म्हणाले की या योजनेमध्ये जास्तीत जास्त हिंदूंची मंदिरे, तीर्थस्थळे आहेत. पण मुस्लिम समाजाची तसेच अन्य काही समाजाची खूपच कमी तीर्थक्षेत्रे आहेत. हा मुख्यमंत्र्यांनी भेदभाव का केला असा सवाल उपस्थित केला?

तसेच सरकार हे फक्त विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याचे ध्यानात ठेवूनच या सगळ्या योजना आणत आहे. व वेगवेगळ्या मार्गाने मतदारांचे आपल्याकडे लक्ष वळवत आहे. परंतु खरे श्रद्धाळू हे सरकारच्या योजनेवर अवलंबून नाहीत. ते स्वखर्चाने तीर्थक्षेत्रावर जाऊ शकतात असेही ते म्हणाले.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment