“जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” ही कविता आपण सर्वांनी ऐकली आहेच. पण आज त्याचा प्रत्यय मध्यप्रदेश मधील एका मोलमजुरी करणाऱ्या गरीब मजुराला आला आहे. खाणीत काम करता करता त्याला सापडला तब्बल 80 लाखांचा नशीब आजमावणारा हिरा. Diamond News Madhya Pradesh Panna
नेमकी काय आहे ही बातमी, आणि कुठे घडली ही घटना. वाचा आमचा स्पेशल रिपोर्ट.
एका मजुराने आपले नशीब आजमावण्यासाठी अवघ्या 200 रुपयात एक खाण खरेदी केली होती आणि त्या खाणीत शोध मोहीम घेत असताना त्याला तब्बल 80 लाख ते 90 लाख रुपयांचा एक हिरा सापडला. ज्याच्यामुळे त्याचे आयुष्यच बदलून गेले. Diamond News Madhya Pradesh Panna
कोठे घडली ही घटना Diamond News Madhya Pradesh Panna
मध्यप्रदेश राज्यातील पन्ना या ठिकाणी ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. पन्ना हे गाव हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. येथे प्रत्येक मजूर आपले नशीब आजमावण्यासाठी काम करतो व हिऱ्यांचा शोध घेतो. Diamond was found in Madhya Pradesh Panna
याच प्रकारे मध्यप्रदेश मधील राजीव गोंड हा मजूर आपले नित्य काम करत होता. शोध घेता घेता त्याला एक हिरा सापडला. हिऱ्यांच्या खाणीत सापडलेला हा हिरा खूपच मोठा आणि आकर्षक आहे. हा हिरा 19.22 कॅरेटचा आहे. आणि या हिऱ्याची किंमत सरकारी लिलावात अंदाजे 80 लाख ते 90 लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे. Diamond found in madhya pradesh and price is 80 Lakh rupees
Diamond News Madhya Pradesh Panna असा सापडला हिरा
राजू गोंड हे नेहमीप्रमाणे आज काहीतरी नवीन घडेल या आशेने खाणीच्या ठिकाणी पोहोचले, व ते आपले काम करू लागले. तेव्हा त्यांनी एक मोठा खड्डा खोदला, माती बाहेर काढली, ती व्यवस्थित चाळली आणि त्या चाळलेल्या माती अन् दगड-धोंड्यांमध्ये हिरे आहेत का याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा अचानकच त्यांना एक काचेसारखा लखलखणारा दगड दिसला. Diamond found in Madhya Pradesh
तेव्हा त्यांनी तो दगड व्यवस्थित स्वच्छ धुऊन घेतला, तेव्हा त्यांना त्या दगडातून चकाकणारा प्रकाश दिसला. त्यामुळे त्यांना जाणीव झाली की हा हिराच आहे, आणि हाच आपले नशीब पलटू शकतो. तेव्हा त्यांनी अधिक माहितीसाठी हा हिरा सरकारी ऑफिसमध्ये जमा केला तेव्हा त्यांना या हिऱ्याची किंमत समजली.
लाडका भाऊ योजना – सरकार देत आहे तरुणांना 10,000 रुपये महिना
कोण आहे हा लखपती झालेला राजू गोंड
राजू गोंड हा मुळात एक ट्रॅक्टर चालक आहे, तसेच तो खाणीत खोदकामही करतो. गेल्या 10 वर्षापासून तो आणि त्याचे वडील हे खोदकामाचे काम करतात. आज पर्यंत त्यांना एकदाही हिरा सापडला नाही. पण आज जो ८० लाखांचा हिरा सापडला त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ भेटले असेच म्हणावे लागेल. Raju Gond Madhya Pradesh Diamond News
यामुळे घेतली जाते हिऱ्याची खाण भाड्याने
मध्यप्रदेश मधील पन्ना हे ठिकाण फक्त आणि फक्त हिऱ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी केंद्र सरकार डायमंड मायनिंग प्रोजेक्ट चालवते. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन NMDC च्या माध्यमातून केंद्र सरकार येथे हिऱ्यांच्या काही खाणी लोकांना भाडे तत्वावर देते. Madhya Pradesh Diamond place on rent
भाडे तत्त्वावर घेतलेल्या या खाणीमध्ये मजूर हिऱ्यांचा शोध घेऊन आपले नशीब आजमावन्याचे प्रयत्न करत असतात. व यातून जे काही हिरे सापडतात ते सरकार कडे जमा करावे लागतात. त्यानंतर सरकारच्या लिलाव प्रक्रियेद्वारे ते हिरे लिलाव केले जातात. व त्यातून काही रक्कम वजा करून त्या मजुरांना रक्कम दिली जाते.
इतके कमी असते हिऱ्याच्या खाणीचे भाडे
ज्या खाणीत लाखो-करोडो रुपयांचे हिरे सापडतात, त्या खाणीचे भाडे ऐकून तुम्हाला धक्काच बसणार आहे. हो, कारण त्या खाणीच्या भाड्याची किंमत खूप म्हणजे खूपच कमी आहे. फक्त 200 ते 300 रुपयांमध्ये काही ठराविक काळांसाठी या खाणी मजुरांना भाडेतत्त्वावर दिल्या जातात. Rent price for diamond place in Madhya Pradesh Panna
त्यामुळे या खाणी भाडे तत्वावर घेण्यासाठी लोकांची नेहमीच वरचढ असते. पण नेहमीच तुम्हाला नशीब साथ देईल का नाही याची गॅरंटी नाही. काही ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान सुध्दा होते.
नवी योजना – ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतभर मोफत तीर्थ यात्रा
एवढी रक्कम मिळणार आहे मजूर राजू गोंड यांना
200 रुपये भाडेतत्त्वावर घेतलेल्या या खाणीतून सापडलेला हिरा जवळपास 80 ते 90 लाख रुपयांचा आहे. पण ती सर्वच्या सर्व रक्कम हिरा शोधून काढणारे मजूर राजू गोंड यांना दिली जाणार नाही. त्यातील काही रक्कम सरकार कपात करणार आहे. Worker Raju Gond got 80 lakh rupess Diamond at Panna Madhya Pradesh
हिऱ्यावर असणारा केंद्र शासनाचा सरकारी रॉयल्टी कर आणि काही चार्जेस हे कमी करून राहिलेली संपूर्ण रक्कम राजू गोंड यांना मिळणार आहे. हा रॉयल्टी कर अंदाजे 12 टक्के एवढा असणार आहे. आणि उर्वरित 8 टक्के कर असा एकूण 20 टक्के कर कपात केला जाणार आहे. संपूर्ण कर वजा करून 80 टक्के रक्कम हिरा शोधणारे राजू गोंड यांना मिळणार आहे.
आधी मी माझे कर्ज फेडणार
राजू गोंड यांनी बोलताना सांगितले की, त्यांच्या अंगावर अंदाजे 5.5 लाख रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज आधी ते फेडणार आहेत. त्यानंतर ते कुटुंबासाठी एक चांगले घर बांधणार आहेत. तसेच ते त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण देणार आहोत ज्यातून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि आमचे नाव रोशन करतील असे ते म्हणाले. Diamond News Madhya Pradesh Panna
तसेच हिऱ्यातून मिळालेली रक्कम आम्ही आमच्या टीम मध्ये असणाऱ्या एकूण 19 लोकांना समसमान प्रमाणात वाटणार आहोत आणि त्या हिऱ्याच्या पैशातून आम्हा सर्वांचा आयुष्यभराचा रोजी रोटीचा प्रश्न कायमचा मिटेल. तसेच ते म्हणाले की हा हिरा सापडल्यामुळे आम्ही खुश आहोतच. पण म्हणून मी माझे नित्य काम सोडणार नाही, मी उद्या पुन्हा खाणीमध्ये जाईन आणि एक नवीन हिरा शोधण्याचा प्रयत्न करीन.
याच्या आधीही सापडला होता दीड कोटींचा हिरा
All Diamond News Madhya Pradesh Panna
सन 2018 मध्ये याच पन्ना या ठिकाणी बुंदेलखंडच्या एका मजुराला हिरा सापडला होता. त्यावेळी त्याची सरकारी लिलाव प्रक्रिया पार पडली, तेव्हा त्याची किंमत ऐकून सर्वांना धक्काच बसला. कारण त्या हिऱ्याची किंमत होती अंदाजे 1.50 ते 1.80 कोटी रुपये.
एवढी महागडी हिरे जास्त सापडत नाहीत. कधीतरी पाच सहा वर्षांमध्ये एकदा सापडतात. पण लोकांना इथे लहान लहान हिरे मोठ्या प्रमाणात मिळत असतात. पण त्या हिऱ्यांचे कॅरेट खूपच कमी असते, त्यामुळे त्यांना म्हणावे तेवढी किंमत मिळत नाही. History of diamond place in Madhya Pradesh Panna