Crime News In Maharashtra | एकमेकांवर केले धारदार शस्त्रांनी वार, दोन भाऊ झाले जागीच ठार

WhatsApp Group Join Now

Crime News In Maharashtra
रोज या ना त्या कारणाने दिवसा ढवळ्या मुडदे पडत आहेत. मारामारी, खून, खंडणी यांसारख्या गंभीर घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर अशा गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी मात्र वाढत आहे.
कधी रागाने बघितल्यामुळे खून होतो. तर कधी गाडी आडवी मारल्यामुळे खून होतो.
कधी पैशाच्या देवाण घेवाण यामुळे खून होतो. तर कधी तंबाखू, दारूला पैसे न दिल्यामुळे खून होतो.

Crime News In Maharashtra यातच आता जमिनीच्या वादातून दोन खून झाले आहेत. सुरुवातीला शाब्दिक वादानंतर अचानकपणे शस्त्रे हातात घेऊन एकमेकावर धावून जाण्याची घटना घडली. आणि यामध्ये दोन सख्या चुलत भावंडांना आपला जीव गमावावा लागला. तर मित्रांनो ही दुःखद घटना आहे अथणी तालुक्यातील खोतवाडी गावातील.

खोतवाडी गावातील खोत कुटुंबात शेत जमिनीचा खूप वर्षांपासून जुना वाद होता. अधून मधून नेहमीच त्यांच्यामध्ये भांडणे होत होती.
काल पण असेच अचानक या दोन्ही सख्ख्या चुलत भावांमध्ये शेत जमिनीचा वाद उफाळून आला. आणि बघता बघता या वादाने रौद्ररूप धारण केले. दोन्ही भावांनी हातात शस्त्रे घेतली आणि एकमेकांवर तुटून पडले. Crime News In Maharashtra

या हाणामारीत दोन सख्खे चुलत भाऊ हनुमंत खोत आणि खंडू खोत यांचा जीव गेला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तसेच दोन कुटुंबामध्ये असणारे वैर आणखीन वाढले आहे. Crime News

नेमका काय आहे वाद

जमिनीच्या कारणामुळे यातील दोन कुटुंबामध्ये खूप दिवसांपासून भांडण चालू होते. पण काल रात्री अचानक पुन्हा या कुटुंबामध्ये वाद उफाळून आला. सुरुवातीला साधारण वाटणारी भांडणे अचानक वाढत वाढत गेली आणि दोन सख्ख्या चुलत भावांनी हातात शस्त्रे घेऊन एकमेकावर चाल केली.

ह्या भांडणात दोन्ही भावंडांना गंभीर दुखापत झाली होती. व या गंभीर हल्ल्यात दोन्ही भाऊ मृत्यूमुखी पडले. या घटनेमुळे अथणी व सीमा भागात मोठी खळबळ माजली आहे.

हेही वाचा : भरधाव ऑडी कारनं रिक्षाला ठोकलं सात जणांनी गमावला जीव

मयत हनुमंत खोत होते ग्रामपंचायत सदस्य

या भांडणाचा बळी गेलेले मयत हनुमंत खोत हे सक्रिय राजकारणात कार्यरत होते. ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होते. परंतु त्यांच्या अशा मृत्यूमुळे ग्रामपंचायतीला तसेच गावाला एक मोठा झटका बसला आहे. व त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Crime News In Maharashtra

आणि बघता बघता दोन कुटुंबे झाली उध्वस्त

मयत हनुमंत खोत आणि खंडू खोत हे दोघे सख्खे चुलत भाऊ होते. पण अचानक झालेल्या वादात रागाच्या भरात दोघांनी एकमेकांवर हल्ला केला आणि दोघेही आपला जीव गमावून बसले. तसे दोघेही वयाने तरुण होते, त्यामुळे दोन्ही कुटुंबाचा ते आधार होते. पण या जमिनीच्या वादातून दोन्ही कुटुंबातील एकेक कर्ता सदस्य हे जग सोडून गेल्याने ही दोन्ही कुटुंबे उध्वस्त झाली आहेत.

WhatsApp Group Join Now
Crime News Marathi

अन्य एका घटनेत जन्मदात्या बापाला झाली जन्मठेप

Father killed his two little daughters
अंधश्रद्धा माणसाला किती क्रूर बनवते याचे एक उत्तम उदाहरण या बातमीतून तुम्हाला समजणार आहे. अंधश्रद्धा आणि पैशाच्या हव्यासापोटी माणूस कोणत्याही थराला जातो हे आपण बघितले आहे अन् अनुभवलेही आहे.
असाच एक मनाला थक्क करणारा प्रकार घडला आहे.

एका जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या दोन मुलींना ठार मारले होते. चंद्रकांत बांदेकर असे नराधम बापाचे नाव आहे. कंग्राळी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली होती.

नेमके काय घडले होते की बापानेच आपल्या मुलींना संपवले

Father killed his two little daughters आरोपी चंद्रकांत बांदेकर याचे एक घर होते. तो कित्येक दिवसापासून हे घर विकायचा प्रयत्न करत होता. पण त्यात त्याला यश येत नव्हते. तेव्हा त्याने अंधश्रध्देच्या मार्ग स्वीकारला. तेव्हा त्याने आपली मोठी मुलगी अंजनी वय 8 वर्षे आणि लहान मुलगी अनन्या वय 4 वर्षे या दोन मुलींना विषारी औषध पाजवून त्या दोन कोवळ्या जीवांना ठार मारले होते.

आरोपीला मिळाली जन्मठेपेची शिक्षा

ही घटना 14 जुलै 2021 रोजी घडली होती. या घटनेमध्ये साक्षीदार, मेडिकल रिपोर्ट यांच्या आधारे बेळगाव अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांनी सर्व बाबींचा, साक्षींचा अभ्यास करून यामधील आरोपी चंद्रकांत बांदेकर याला त्याच्यावर असलेल्या दोन खून प्रकरणाच्या आरोपांमध्ये दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. व त्यासोबतच त्याला 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

तारदाळ मध्ये घडली चोरीची घटना,
चोरट्याने चक्क जर्सी गाईची केली चोरी

Crime News In Maharashtra and Kolhapur
तारदाळ येथे एक चोरीची घटना घडली आहे. संदीप पाटील यांचा तारदाळ मध्ये असलेल्या गोठ्याचे कुलूप तोडून दोन जणांनी जर्सी गाई चोरून नेल्या होत्या. त्यावेळी पाटील यांनी आपल्या गाईंचा गावामध्ये शोध घेतला पण त्यांना कुठेच मिळून आल्या नाहीत. त्यामुळे गावात एकच खळबळ मारली होती.

हेही वाचा : रील काढण्याच्या नादात 300 फूट दरीत पडून तरुणीचा मृत्यू

तेव्हा संदीप पाटील यांनी या चोरीबद्दल पोलिसात फिर्याद नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी लगेच सखोल चोकशी करून दोन भामट्या चोरांना अटक केली. व त्यांच्याकडून चोरी झालेल्या दोन जर्सी गाई हस्तगत केल्या.

याप्रकरणी राजाराम आकाराम कांबळे वय 31, राहणार कोंडीग्रे आणि वैभव अनिल पुजारी वय 28, राहणार चंदुर यांना अटक करण्यात आले आहे. या संशयित चोरांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आमच्या वाचकांना जाहीर आवाहन

श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन निव्वळ अंधश्रद्धेवरच विश्वास ठेवून कोणतेही काम करू नका. कारण अंधश्रद्धेमुळे केलेल्या कामाने नेहमी तुमचे नुकसानच होणार आहे, फायदा कधीच होणार नाही. त्यामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली लोक तुमची लुबाडणूक करत आहेत हे ध्यानात ठेवावे व आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची जाणीव ठेवावी.
Digital Batmya Marathi Crime News

WhatsApp Group Join Now

Leave a Comment