भाजप एकनाथ शिंदेंना सोडून ठाकरेंना जवळ करणार? | BJP with Shivsena Eknath Shinde

WhatsApp Group Join Now

BJP with Shivsena Eknath Shinde गेल्या काही दिवसांपासून शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप यामध्ये अंतर्गत कुरघोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. व कुठेतरी एकनाथ शिंदे गट नाराज असल्याचे दिसत आहे त्यातच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकीला सतत गैरहजर राहत आहेत.

व ते आपल्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी जात आहेत. त्याची कारणे ते वेगवेगळी सांगत आहेत पण राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे नाराज आहेत.खऱ्या अर्थाने हा वाद सुरू झाला जेव्हा महायुतीची सत्ता महाराष्ट्रात आली तेव्हापासून. म्हणजे मुख्यमंत्री पदापासून ते मंत्रिपद वाटपापासून ते आता पालकमंत्री पदापर्यंत महाराष्ट्रात शिंदे गटाला जी काय वागणूक मिळाली. BJP with Shivsena Eknath Shinde

त्यामुळेच एकनाथ शिंदे नाराज असल्याचे दिसत आहे.पण एकनाथ शिंदे भाजपवर दबाव टाकण्यासाठी असं करत आहेत असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पण त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये आणि विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी भाजप एकनाथ शिंदेंना लांब करून इतर पर्याय शोधत आहे का असेच महाराष्ट्रातील तमाम जनतेला वाटत आहे. BJP with Shivsena Eknath Shinde

भाजप आणि ठाकरे गट जवळ येण्याची ही आहेत कारणे

गेल्या महिनाभरात ठाकरे गटाचे मुख्य नेते उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे हे तब्बल तीन ते चार वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यासोबतच शिवसेनेचे मुखपत्र सामना या पेपर मधून कायम भाजप आणि मोदींवर टीका केली जाते. पण काही दिवसांपासून हा सूर बदललेला दिसत आहे. सामना न्युज पेपर मधून आता भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारे लेख प्रकाशित होत आहेत. त्यामुळेच कुठेतरी ठाकरे गट भाजपला जवळ करत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. BJP with Shivsena Eknath Shinde

WhatsApp Group Join Now
BJP with Shivsena Eknath Shinde

त्यासोबतच गेल्यात आठवड्यात भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते की भाजप आणि शिवसेनेची जुनी युती होती. Chandrakant Patil met with Uddhav Thackaray

भाजप आणि ठाकरे गट जवळ येण्याचे दुसरे कारण म्हणजे मुंबई महापालिका. कित्येक वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता आहे व मुंबई महापालिकेची सत्ता हीच शिवसेनेचे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण चालवते. कारण मुंबईत शिवसैनिक तळागाळात अगदी घर तिथे शिवसैनिक अशा प्रकारे शिवसेनेने कार्यकर्ते जमवले आहेत.

आणि त्यामुळेच शिवसेना कुठेतरी आपल्या होम ग्राउंड वर आणखीन बळकट होण्यासाठी व महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपला जवळ करत आहेत. त्यासोबतच शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी मधून बाहेर पडलेलीच आहे व ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला होता त्यामुळे त्यांना आता कोणाची बंधन नाही त्यामुळे ते भविष्यात भाजपचा विचार करतील असेही म्हटले जात आहे. BJP with Shivsena Uddhav Thackaray

चक्क शिंदे गटाच्या नेत्यालाच वाटत आहे की ठाणे आणि एकनाथ शिंदे एकत्र यावेत

महाराष्ट्रात सध्याच्या बदलत्या वातावरणात शिंदे गट आणि ठाकरे गट हे जवळपास यांच्यातील संबंध जवळपास खूपच विकोपाला गेले आहेत दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर खूप खालच्या भाषेत टीका केली होती काहींनी तर बाप काढले होते यातून हा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते त्यातच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील व दोन्ही मुख्य नेत्यातील तसेच कार्यकर्त्यातील कार्यकर्त्यांची मने दुखावली गेली होती.

Will Eknath Shinde and Uddhav Thackaray join?

त्यामुळे ठाकरे गटआणि शिवसेना शिंदे गट आता कधीच एकत्र येणार नाही असेच वाटत होते पण अलीकडेच शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले होते की शिंदे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र यायला हवे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या चक्क शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी ही भूमिका मांडल्यामुळे राजकारणात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला होता. Will Eknath Shinde and Uddhav Thackaray join?

शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संभाव्य राजकीय घडामोडी

अलीकडेच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीला राजकीय दृषटिकोनातून पाहिले जात आहे. या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये काही बदल घडू शकतात. विशेषत: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय भागीदारीसाठी तयारी होऊ शकते. शिंदे आणि ठाकरे यांच्यातील अनपेक्षित भेट ही एका वळणावर येत आहे, जिथे दोन्ही नेत्यांच्या पक्षांच्या भविष्यातील दिशा ठरू शकतात. तसेच राज ठाकरे यांनी विधानसभा निकालावरून EVM घोटाला झाला असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतली असल्याचे बोलले जात आहे. BJP with Shivsena Eknath Shinde

ठाकरे यांचे सहा खासदार भाजपकडे जाणार?

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर भाजपने शिंदेगटा सोबत युती करून सत्ता काबीज केली होती. त्यानंतर अजित पवार यांना भाजपने महायुतीत आणले. आता एक नवीन चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या खासदारांवर भाजपची नजर असल्याची.

लोकसभेत उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार आहेत, आणि त्यापैकी सहा खासदार भाजपच्या गटात जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. विशेषत: ठाकरेंचे खासदार मुंबई आणि ग्रामीण भागातून आलेले असून, यातील पाच खासदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे. तथापि, एका खासदारामुळे या पक्षांतरणाचा निर्णय थोडा रखडला आहे. भाजपने विशेष रणनीती तयार केली असून, खासदारांना पक्षांतरासाठी आमंत्रण दिले आहे, त्याचवेळी पक्षांतरबंदी कायद्याचा धोका देखील समोर आहे. BJP with Shivsena Eknath Shinde

काय आहे पक्षांतरबंदी कायदा आणि धोका

पक्षांतरबंदी कायदा राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये खूप चर्चेत होता. या कायद्यांतर्गत, एखाद्या पक्षाच्या दोन तृतीयांश (2/3) खासदार किंवा आमदार दुसऱ्या पक्षात जात असतील, तर त्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नऊ खासदारांमध्ये किमान सहा खासदार भाजपमध्ये सामील होणे आवश्यक आहे, ज्यामुळे या गटाचे भाजप मध्ये रूपांतर शक्य होईल. तथापि, एक खासदार पक्षांतर करण्यास तयार न झाल्याने पक्षांतराची संपूर्ण प्रक्रिया थांबली आहे. BJP with Shivsena Eknath Shinde

शिंदे आणि भाजपमध्ये वाढला तणाव

गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गट आणि भाजप यांच्यात तणाव वाढत असल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने शिंदे गटाच्या सदस्यांना साईडलाइन करण्याचे प्रयत्न केले आहेत. यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. त्यामुळे जर ठाकरेंचे खासदार भाजपमध्ये सामील झाले, तर शिंदे गटाच्या नाराजीनंतर भाजपवर अधिक दबाव येऊ शकतो. BJP with Shivsena Eknath Shinde

भाजपला ठाकरेंचे खासदार आपल्या गटात घेणे खूपच महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांची केंद्रातील सत्ता मजबूत होईल. भाजपला सध्या राज्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही, परंतु दिल्लीत भाजपची सत्ता काही नेत्यांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. विशेषत: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू सारख्या बेभरोशा नेत्यांच्या सहयोगावर केंद्राची सत्ता टिकून आहे. त्यामुळे ठाकरेंचे खासदार भाजपमध्ये सामील झाल्यास भाजपची पकड मजबूत होईल. BJP with Shivsena Eknath Shinde

BJP Eknath Shinde War

तथापि, यामुळे शिंदे गटाला एक नवीन धोका निर्माण होईल. शिंदे गटाच्या खासदारांची संख्या सात आहे, आणि त्यात अजून तीन खासदार भाजपच्या पाठिंब्यावर आहेत. जर ठाकरे गटाचे सहा खासदार भाजपमध्ये सामील झाले, तर शिंदे गटाची ताकद कमी होईल, आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. भाजपने याची कल्पना घेत शिंदे गटाला एकदम साइडलाइन करण्याची योजना आखली आहे. BJP Eknath Shinde War

भविष्यातील राजकीय संघर्ष

जर ठाकरे गटाचे खासदार भाजपमध्ये सामील झाले, तर महायुतीतील शिंदे-भा.ज.प. संघर्ष आणखी तीव्र होईल. शिवसेनेच्या सध्याच्या पक्षीय संरचनेत शिंदे गट आणि भाजप यांच्यात वाढत असलेला तणाव राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतो. विशेषत: काही ठिकाणी पालकमंत्री पदावरून शिंदे गटाने नाराजी दर्शवली आहे. रायगड आणि नाशिकतील पालकमंत्री पदांच्या वाटपावरून शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये असंतोष वाढला होता. यामुळे भविष्यात एक मोठा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. BJP with Shivsena Eknath Shinde

शेवटी, हे स्पष्ट होईल की ठाकरेंचे खासदार भाजपमध्ये सामील होतात का नाही. परंतु, जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर त्याचे राज्यातील राजकारणावर मोठे परिणाम होतील. शिंदे गटाच्या नाराजीमुळे भाजपच्या आंतरिक संघर्षात वाढ होईल, आणि राज्यातील राजकीय पॅटर्नही बदलू शकतो.

तुम्हाला काय वाटते, ठाकरे गटाचे खासदार भाजपमध्ये प्रवेश करतील का? आणि यामुळे शिंदे गटाची भाजपवरची नाराजी आणखी वाढणार का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

हे हि वाचा :-

उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळणार गोलीगत धोका, हे मोठे नेते सोडतील पक्ष?

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मिळाली जीवे मारण्याची धमकी दिली

WhatsApp Group Join Now

Leave a Comment