भ्रष्टाचार प्रकरणामध्ये नेहमीच पवार कुटुंबाचे नाव चर्चेत येत असते. त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नेहमी होत असतात. पण यापैकी कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाहीत. Amit Shah on sharad pawar
मध्यंतरी सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना ED चे समन्स आले होते. पण त्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळून मोठा दिलासा मिळाला होता.
आता पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि हे आरोप केले आहेत थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने. हो केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी थेट राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देशातील सर्वात भ्रष्टाचार राजकीय नेता असे आरोप पुण्यातील झालेल्या भाजपच्या मेळाव्यात केला. Amit Shah said Sharad Pawar is most corrupted Indian political leader
आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले पण त्यांनी आरक्षण घालवले
तसेच अमित शहा यांनी मराठा आरक्षण यावर सुद्धा भाष्य केले. ते म्हणाले, 2014 ला जेव्हा आमची राज्यामध्ये सत्ता होती तेव्हा आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते.
त्यानंतर सत्ता त्यांची आली आणि आम्ही दिलेले आरक्षण गेले.
आता आम्ही पुन्हा महाराष्ट्र मध्ये महायुतीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेत आलो आहे. त्यासोबतच मराठा समाजाला आरक्षण पुन्हा दिले आहे. एकंदरीत जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा मराठा समाजाला आरक्षण असते आणि जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा मराठा समाजाचे आरक्षण गायब होते अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा : आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात हिंसाचार, अंधाधुंद गोळीबार 100 ठार
राहुल गांधी अहंकारी झाले आहेत
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी हे खूपच अहंकारी झाले आहेत.
आमचे एकूण जवळपास 240 उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत जिंकले. पण विरोधी पक्षाचे सर्व मिळून सुद्धा एवढे उमेदवार जिंकू शकले नाहीत तरी त्यांना एवढा अहंकार कशाचा असा सवाल ही त्यांनी विरोधी पक्ष आणि राहुल गांधींना उपस्थित केला.
तसेच येणाऱ्या चार ते पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लागणार आहे तेव्हा पुन्हा एकदा भाजप मित्र पक्ष महायुतीचे स्थिर सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या.
मोदींनी घडवला इतिहास
तब्बल 60 वर्षानंतर भारताचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद भूषवूण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी इतिहास घडविला.
याचे सर्व श्रेय जाते भाजप आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना. त्यांनी जिवाचे रान करून लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार केला आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात एनडीए सरकार स्थापन केले आणि मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत
देशभरात विरोधक एकवटले आहेत. ते भाजप आणि मित्र पक्षाचा सामना करू शकत नाहीत त्यामुळे ते मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.
भाजपा सत्तेत आले तर संविधान बदलतील असा खोटा अजेंडा त्यांनी ठेवून लोकसभा निवडणूक लढवली. पण त्या त्यांना यश आले नाही व मतदारांनी पूर्ण विश्वास टाकत भाजप पक्षाला पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली.
आम्ही देशातून आतंकवाद संपवला. आता विरोधकांकडून होणारे जातीपातीचे राजकारण ही आम्ही संपवणार आहोत. तसेच उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा आणला आहे.
श्री राम जन्मभूमी साठी केला मोठा संघर्ष
तमाम भारतवासीयांची इच्छा होती की आयोध्या मध्ये श्री राम लल्लांचे मंदिर व्हावे. पण मंदिर निर्मितीचे काम वर्षानुवर्षे रखडले होते. पण मोदीजी आणि योगीजी यांच्या नेतृत्वाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि आयोध्या मध्ये श्री रामचंद्रांचे जगाला हेवा वाटेल असे भव्य दिव्य मंदिर उभारले उभा केले.
त्यासाठी आम्ही खूप वर्ष संघर्ष केला व त्या संघर्षामुळेच आम्ही श्री राम मंदिर उभारले. आमच्या एवढा संघर्ष कोणीच केला नाही असेही पुण्यात भाजपच्या मेळाव्यात अमित शहा म्हणाले.
सुप्रिया सुळे यांनी केली भाजप आणि अमित शहांवर टीका
अमित शहा यांनी शरद पवारांवर सर्वात भ्रष्ट राजकारणी असा आरोप केला होता त्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की अमित शहा यांच्या भाजप सरकारने देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला होता. पण हीच भाजपची लोक आता पवार साहेबांवर वेगवेगळ्या कारणाने टीका करत आहेत. कारण त्यांना चांगलच माहिती आहे की शरद पवार साहेबांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही त्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत असेही त्या म्हणाल्या.
भाजपने ज्या राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपने आपल्या पक्षात घेतले असे म्हणत त्यांनी अमित शहा यांच्या पाठीमागे बसलेले अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली.
धनंजय मुंडे यांचे धक्कादायक वक्तव्य
अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्यावर बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, आरोपा मध्ये काहीतरी तथ्य असणार आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर आरोप केले आहेत.
एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून असे दिसत आहे की त्यांनी अप्रत्यक्षपणे अमित शहा यांच्या टीकेला सहमती दर्शवली आहे.
हेही वाचा : कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही – MIM नेत्याचे वक्तव्य
माझे गुरु शरद पवार नाहीत, माझे खरे गुरु अजित पवार हेच आहेत
परळीचे आमदार, मंत्री धनंजय मुंडे बोलताना पुढे म्हणाले की, माझे राजकीय गुरू आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे हे आहेत.
तसेच शरद पवार हे माझे गुरु नाहीत तर अजित पवार हेच माझे गुरु आहेत. मी आज राजकारणात जो आहे ते फक्त आणि फक्त अजित पवार यांच्यामुळेच आहे. कठीण परिस्थितीत त्यांनी मला साथ दिली, माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला नेतृत्व करण्याची संधी दिली. आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करून दाखवला.
तसेच अजित पवार हे फक्त माझे गुरुच नाहीत तर ते माझे मोठे बंधू असल्यासारखे मला वाटत आहे. त्यामुळे तेच माझे गुरु आहेत असे ते म्हणाले.
अजित पवार लढवणार स्वबळावर निवडणूका
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा फक्त एकच उमेदवार निवडून आला होता. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नीचा धक्कादायक रित्या पराभव झाला होता. तेव्हापासून अजित पवार गटात स्वबळावर लढण्याची मागणी केली जात होती.
काल गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अजित पवार यांनी घोषणा केली की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. लोकसभा निवडणुका आम्ही तिन्ही घटक पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून लढवली होती, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकट्याने लढणार आहोत. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.