Aanvi Kamdar Died At Kumbhe Waterfall
पावसाळा सुरू झाला की धबधबे ओसंडून वाहतात आणि या ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांमध्ये पावसाळा एन्जॉय करायची प्रत्येकाची इच्छा असते. जणू काही आपण पावसाळा सुरू व्हायची वाटच बघत असतो.
पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहोत जी वाचून तुम्हाला खरंच धक्का बसेल. आणि धबधब्याला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच दहा वेळा विचार कराल.
तर ही बातमी आहे रायगड मधल्या माणगाव मधील कुंबे धबधब्या जवळची. या धबधब्या जवळ एक मोठा अपघात घडला आणि बघता बघता एक तरुणी तब्बल ३०० फूट खोल असणाऱ्या दरीत पडून मृत्यूमुखी झाली. Aanvi Kamdar Died At Kumbhe Waterfall
तर कहाणी अशी आहे की, मुंबई मधून काही तरुण-तरुणी आपापल्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी खास कुंभे धबधबा येथे आले होते. त्यांच्यासोबत आनवी कामदार ही रील स्टार सुद्धा आली होती. ओसंडून वाहणाऱ्या या धबधब्यामध्ये तिला रील शूट करण्याचा खूप मोह झाला पण तिला तिच्या मित्र-मैत्रिणींनी अडवलं होत. तरीही ती त्यांना न जुमानता रील शूट करण्याचं धाडस तिने केलेच. आणि त्यातच तिचा अपघात झाला आणि तिने या जगात निरोप भेटला. Aanvi Kamdar Died At Kumbhe Waterfall
त्या तरुणी सोबत नेमक काय घडलं
आनवी कामदार तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत पिकनिक एन्जॉय करत होती. धबधब्या जवळ असणाऱ्या खूपच अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना ती रील शूट करत होती आणि अचानक तिचा पाय घसरला आणि ती खोल दरीत पडली.
यावेळी याची माहिती मिळताच बचाव पथके, पोलीस प्रशासन, गावातील लोक, महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व आनवी चा शोध घेऊ लागले. पण दाट धुक्यामुळे त्यांना आनवी चा थांग पत्ता लागत नव्हता. सतत पडणारा पाऊस, प्रचंड धुके आणि कोसळणारे मोठमोठे दगड धोंडे यामुळे बचावकार्यात भरपूर अडचणी येत होत्या,
तरीही अथक प्रयत्नातून त्यांनी तीला शोधून काढलेच. त्यावेळी अनवी चा श्वास सुरू होता पण तेथून रुग्णालय खूप लांब असल्यामुळे तिला रुग्णालयात पोहोचण्यास खूप उशीर झाला आणि वाटेतच तिचा अंत झाला. Aanvi Kamdar Died At Kumbhe Waterfall
अतिउत्साहाच्या भरात अनवी खूप जलद पणे चालत होती आणि मोबाईलवर रील शूट करत होती. त्यामुळे तिला रस्त्याचा आणि पावसाचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडली असे तिच्या मित्र-मैत्रिणींनी आणि स्थानिकांनी सांगितला.
विरासू या तामिळ चित्रपटातील एका दृश्या मध्ये या कुंभे धबधब्याचा सीन घेतला आहे. तेव्हापासून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
हेही वाचा : लाडका भाऊ योजना – सरकार देत आहे तरुणांना 10,000 रुपये महिना
रील ने घडवले आयुष्य आणि रील नेच संपवल तिचं आयुष्य
आनवी कमदार ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असलेली रील स्टार होती. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. तिचे इंस्टाग्राम वर जवळपास 3 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते हजारो लाइक्स आणि कमेंट द्यायचे. रील मुळे ती सोशल मीडियावर चमकत होती. आणि वेगाने तिची ओळख निर्माण करत होती.
Aanvi Kamdar Died At Kumbhe Waterfall ती स्वतः एक Social Media Influencer होती. पण आज तिच्या अचानक जाण्याने डिजिटल युगात व तिच्या फॅन फॉलोविंग मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रील मुळे ती घडली आणि रील मुळेच ती संपली असं म्हणावं लागेल
काही दिवसांपूर्वीच घडली होती अशी दुर्घटना
पुण्यातील लग्न समारंभासाठी आलेल्या आग्र्यातील काही पाहुण्यांचा लोणावळ्या जवळील भुशी धरणामध्ये वाहून गेल्याने अंत झाला होता. त्या अपघातामध्ये अख्ख कुटुंब च्या कुटुंब वाहून गेलं होतं. शुभ कार्य झाल्यानंतर ही मोठी दुर्घटना घडली होती त्यामुळे अपघातग्रस्त कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. ही घटना सुद्धा अतिउत्साहात झाली होती असे स्थानिकांचे म्हणणं होतं.
तसेच मध्यंतरी पुणे जिल्ह्यातल्या लोहगडावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांची गर्दी झाली होती आणि अचानक जोरात पाऊस आला. बघता बघता पावसाने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे पर्यटकांना तिथून हलताही येत नव्हते. जवळपास चार तास पर्यटक महादरवाज्या जवळ अडकून पडले होते. पण सुदैवाने तेथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा : विशाळगडावर अतिक्रमण, दगडफेक-हल्ला.
धबधब्याजवळ अपघात होण्याची ही आहेत कारणे
धबधब्याजवळ पर्यटक हे फक्त आणि फक्त एन्जॉय करण्यासाठी येतात. पण त्याचवेळी ते स्वतःच्या जीवाची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात व अति उस्ताहाच्या भरात स्वतःचा जीव गमावून बसतात.
खालील चुका पर्यटकांकडून नेहमीच होत असतात
- मोबाईलचा अतिवापर करून रील शूट करणे.
- पाण्याचा अंदाज न घेता खोल पाण्यात जाणे.
- माहिती नसलेल्या ठिकाणी मुद्दाम उभे राहून फोटो घेणे.
- स्थानिक लोक, बचाव कार्यपथक यांचे न ऐकता फुल्ल जोश मध्ये पिकनिक एन्जॉय करणे.
- स्वतःच्या बचावासाठी काहीही साहित्य जवळ न बाळगणे. उदा. लांब रशी, दोरा.
धबधब्याला जाताना आमच्या वाचकांसाठी खास टिप्स आणि गाईडलाईन्स
- धबधब्याला जाताना नेहमी First Aid बॉक्स आणि काही बचावात्मक साधन घेऊन जाणे.
- ट्रीपला जाताना अनुभवी लोकांसोबत जाणे.
- गरज वाटल्यास स्थानिक नागरिक गाईड म्हणून नेमावा.
- अति उस्ताहाच्या भरात ग्रुप सोडून इतर ठिकाणी जाऊ नये.
- ट्रेकिंग मध्ये चालताना खरबडीत शूज किंवा चप्पल घालावेत जेणेकरून निसटत्या रस्त्यावर आपला पाय घसरणार नाही.
- चालताना आपल्या सोबत वॉकिंग स्टिक ठेवावी त्यामुळे उतरणे आणि चढणे सोयीस्कर होते.
- अवघड ठिकाणी सेल्फी आणि फोटो घेण्याचा मोह टाळावा.
ही आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे
आम्ही तुम्हाला काही प्रसिद्ध धबधबे सांगणार आहोत. जिथे तुम्ही पावसाळा एन्जॉय करण्याचा विचार करू शकता. पण यातील काही धबधबे हे खूपच धोकादायक आहेत, तर काही धबधबे जणू काही स्वर्ग असल्यासारखेच सुंदर आहेत.
- आंबोली धबधबा
- लिंगमळा धबधबा
- देवकुंड धबधबा
- मारलेश्वर धबधबा
- माळशेज धबधबा
- राऊतवाडी धबधबा
तर मित्रांनो यापैकी तुम्हाला आवडणारा धबधबा कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या धबधब्यावर गेला आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.