Reservation Violence सध्या जगभरात आरक्षणाचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. जो तो समाज आपल्याला आरक्षण हवे, तसेच आपले आरक्षण टिकावे यासाठी रोज नवनवीन दावे करत असतो, मोर्चे काढत असतो, आंदोलन करत असतो. तसेच उपोषण, आमरण उपोषण, आत्मदहन असे मार्ग निवडत आहेत. तर आरक्षणासाठी कित्येक लोकांनी आपला जीवही गमावला आहे.
तर मित्रांनो आज तुम्हाला आम्ही एक अशी घटना सांगणार आहोत जिथे आरक्षण मिळावे या मागणीसाठी लोकांनी आंदोलन करत भव्य मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. पण हा मोर्चा एवढा मोठा होता की चक्क सैन्य दलाला रस्त्यावर उतरावे लागले. व लोकांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करावे लागले. पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून सैन्याने, पोलीस दलाने मोर्चावर गोळीबार करत, हल्ला करत आंदोलन बंद पाडण्याचे अनेक प्रयत्न केले. मिळालेल्या माहितीनुसार या झटापटीत जवळपास 100 ते 120 आंदोलकांनी आपला जीव गमावला. तसेच त्यात जवळपास 500 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे.
Reservation Violence तसेच हिंसाचार न वाढण्यासाठी सरकारने मेट्रो सेवा, बस सेवा बंद केली आहे, इंटरनेट सेवा ठप्प केली आहे. तसेच शाळा कॉलेज यांना अनिश्चित काळासाठी सुट्टी जाहीर केली आहे.
आंदोलक कोणाचेच ऐकण्याच्या तयारीत नाहीत
आरक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलकांकडून गेल्या पंधरा दिवसापासून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची तीव्रता एवढी मोठी वाढली आहे की लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. तेथील पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, सरकार यांना आंदोलनकर्त्यांनी हादरवून टाकले आहे. Reservation Violence
गेल्या पंधरा दिवसापासून चालू असलेल्या या आंदोलनात आंदोलक कायदा आणि पोलीस प्रशासन यांना मानायला तयार नाहीत.
पंतप्रधानांनी शांत राहण्याचे व आंदोलनाची सांगता करण्याचे आवाहन केली होते. पण तेथील लोक पंतप्रधानांचे सुद्धा ऐकायला तयार नाहीत.
हेही वाचा : विशाळगडावर अतिक्रमण, दगडफेक-हल्ला. वाचा संपूर्ण बातमी
कुठे घडली ही भयंकर घटना
Reservation Violence in Bangladesh बांगलादेशात ही भयंकर घटना घडली आहे. हे आंदोलन आरक्षणाला विरोध करण्यासाठी केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून विविध राज्यात, विविध ठिकाणी लोक वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहेत. हातात दगड, धोंडे, काठ्या लाठ्या घेऊन ते आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत.
त्यामुळे हे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत आहे परिणामी पोलीस प्रशासन आणि सैन्य दलाला रस्त्यावर उतरून आंदोलकांवर सौम्य लाटी चार्ज करावा लागला. पण तरीही आंदोलक शांत राहण्याच्या तयारीत नव्हते. पण या आंदोलनात झालेल्या अंत्यत धक्कादायक हिंसाचारामध्ये आतापर्यंत जवळपास 100 ते 120 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे पण तरीही लोक त्यांना न जुमानता आपले आंदोलन अधिक तीव्र करत आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका हा आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे.
पंतप्रधानांनी केले आवाहन पण झाले उलटेच
पंतप्रधान शेख हसीना यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना शांत राहण्यास सांगितले व त्यांच्या मागण्या समजून घेऊन निश्चितच याच्यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण तरी आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत.
तसेच त्यांच्या आवाहनाला लोकांनी योग्य प्रतिसाद न देता उलट आपले आंदोलन चालूच ठेवले व अत्यंत हिंसक बनवले. सरकारी बस, खाजगी बसेस, वाहने यांना लक्ष करून मोठी जाळपोळ केली. Reservation Violence in Bangladesh
तसेच सरकारी टेलिव्हिजनवर जोरदार हल्ला चढवत आग लावून देण्यात आली. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी अंदाजे जवळपास पत्रकारांसोबत 1300 कर्मचारी काम करत होते पण अचानक घडलेल्या या आगी मुळे गोंधळ निर्माण झाला होता पण पोलिसांनी आणि प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना काही मिनिटातच बाहेर काढले. आणि त्यामुळे मोठी जीवित हानी टळली.
हेही वाचा : रील काढण्याच्या नादात 300 फूट दरीत पडून रील स्टारचा मृत्यू
या कारणामुळे होत आहे विरोध आणि आंदोलन
- बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यां मध्ये मोठ्या प्रमाणात आरक्षण दिले जात आहे या आरक्षणाला लोकांनी विरोध दर्शवला आहे
- जे जवान 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धामध्ये सहभागी होते त्यांना बांगलादेशात मुक्ती योद्धा असे संबोधले जाते. आणि नवीन नियमानुसार मुक्ती योद्धाच्या मुलांसाठी जवळपास एक तृतीयांश सरकारी नोकऱ्या बांगलादेश सरकारने आरक्षित केल्या आहेत. याचा विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे.
- तसेच सरकारने मुक्ती योद्धाच्या आरक्षण वाढ केलेली आहे. ही वाढ रद्द करण्यासाठी हे आंदोलन होत आहे.
- आरक्षणाबाबतची सरकारची भूमिका अत्यंत भेदभाव जनक आहे. सरकार फक्त काही लोकांनाच उच्च स्थान देत आहे असे आंदोलकांचे म्हणणे आहे
- सरकारी नोकऱ्या वडिलांनी केलेल्या कामाच्या जोरावर न देता, मेरीटच्या आधारावर नोकऱ्या दिल्या पाहिजेत ही प्रमुख मागणी आंदोलकांची आहे
बांगलादेशात लागला कर्फ्यु
Reservation Violence in Bangladesh देशामध्ये दिवसें दिवस परिस्थिती चिंताजनक बनत आहे. लोक खाजगी वाहने, सरकारी वाहनांसह, सरकारी ऑफिसेस, कार्यालय यांच्यावर तुफान दगडफेक, जाळपोळ करून हल्ला करत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. त्याला आळा बसण्यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांनी संपूर्ण देशभरात संचारबंदी कर्फ्यू लागू केली आहे.
बांगलादेशात आरक्षणाची अशी आहे टक्केवारी
बांगलादेशात सध्या 56% आरक्षण लागू आहे
- सर्वात जास्त आरक्षण आहे मुक्ती योध्दाच्या मुलांना. त्यांना जवळपास 30 टक्के आरक्षण दिले जात आहे.
- त्या खालोखाल महिलांना एकूण आरक्षणापैकी 10 टक्के आरक्षण दिले जात आहे.
- तर इतर वेगळ्या जिल्ह्यासाठी 10 टक्के आरक्षण आरक्षित केलेले आहे.
- तसेच अल्पसंख्याक जातींसाठी 6 टक्के आरक्षण दिले जात आहे.
- हे सर्व आरक्षण 56 टक्क्यांच्या घरात पोहोचले आहे.
- तर उर्वरित फक्त 44 टक्के आरक्षण हे मेरिट वर आहे.
पण यात देखील मुक्ती योध्दाची मुले, तसेच इतर अल्पसंख्याक जाती जमाती या आरक्षणाचा फायदा घेताना दिसत आहेत. Reservation Ratio in Bangladesh
पण बांगलादेशामध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाला सरकारने कोणतेच आरक्षण दिलेले नाही. त्यांना फक्त मेरिटच्या जोरावरच सरकारी नोकरी मिळवता येते. त्यामुळे बांगलादेशात हिंदू समाज आरक्षणापासून वंचित आहे.