नमस्कार मित्रांनो, सध्या झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने लोक वाईट मार्गाला लागत आहेत. त्यासाठी ते ऑनलाईन गेम्स, फ्रॉड हा मार्ग अवलंबित आहेत, आणि त्यातून मग वाद विवाद, मारहाण, हत्तेचा प्रयत्न आणि खून या गोष्टी सर्रासपणे घडत आहेत. या ऑनलाइन गेम च्या जाळ्यात बहुतांशी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात अडकला आहे. त्यामुळे ते कमावण्याच्या वयात आपल्या जवळचे पैसे घालवत आहेत आणि परिणामी त्यांचे आयुष्य तर उध्वस्त होत आहेतच त्यासोबतच ते कर्जबाजारी सुद्धा होत आहेत आणि पुढे मग या कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणखीन काहीतरी चुकीचा अवैध शॉर्टकट मार्ग अवलंबत आहेत. Murder In Sambhajinagar

त्यातूनच रोज नवनवीन गुन्हे घडत आहेत. अशाच प्रकारचा एक गुन्हा नुकताच घडला आहे. त्यामध्ये आपल्या सख्ख्या मावस भावाने आपल्याच सख्ख्या मावस भावाचा पैशांच्या कारणासाठीfghuiugfdjjjfghjff1uiigr काटा काढला आहे ते पण फक्त 50 हजार रुपयांसाठी. ऑनलाइन गेम्सचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडू लागला आहे, आणि त्यात खेळणाऱ्यांमध्ये प्रतिस्पर्धा आणि ताण निर्माण होत आहे. त्याचाच एक भयानक परिणाम एक तरुणाच्या मृत्यूच्या रूपात समोर आला आहे. एका भयानक हत्येचा तपास करत असताना पोलिसांना समजले की, दोन मावस भावांमध्ये ऑनलाइन गेममुळे झालेला वाद आणि आर्थिक नुकसान यामुळे एका युवकाचा जीव गेला. चला तर, या धक्कादायक घटनेचा तपशिल जाणून घेऊया.
हा संपूर्ण प्रकार रोजी घडला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचेwwwwwwwww नाव प्रदीप विश्वनाथ निपटे आहे, आणि तो 19 वर्षांचा एक हुशार विद्यार्थी होता. प्रदीप बीएससी च्या शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होता. त्याचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील पिंपतखेड होते. प्रदीप सहा वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण घेत होता आणि त्याने या शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. प्रदीप त्याच्या चार मित्रांसोबत उस्मानपुरातील रेड कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहत होता. Murder In Sambhajinagar
